‘बिग बॉस मराठी 5’च्या घरातून अरबाज बाहेर पडताच ढसाढसा रडली निक्की; शोच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ही गोष्ट

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमधून आणखी एक सदस्य रविवारी घराबाहेर पडला. हा सदस्य होता अरबाज पटेल. निक्कीमुळे तो घरात कॅप्टन बनला होता, पण कॅप्टनवरच एलिमिनेशनची वेळ बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली.

'बिग बॉस मराठी 5'च्या घरातून अरबाज बाहेर पडताच ढसाढसा रडली निक्की; शोच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ही गोष्ट
Arbaaz Patel and Nikki TamboliImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 23, 2024 | 8:24 AM

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. रविवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये या घरातून आणखी एक सदस्य बाहेर पडला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून प्रत्येक आठवड्यात कोणाला ना कोणाला बाहेर पडावंच लागतं. मात्र बिग बॉसच्या इतिहासात अशी गोष्ट पहिल्यांदा घडली की घरातील कॅप्टनलाच एलिमिनेट व्हावं लागलं. ‘स्प्लिट्सविला’ फेम अरबाज जेव्हा या शोमध्ये सहभागी झाला, तेव्हा त्याच्या एका वेगळ्या स्टाइलने आणि खेळीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या जिगरबाज तरुणाने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चांगलाच धुमाकूळ घालता होता. निक्की तांबोळी आणि त्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. पण आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील त्याचा प्रवास संपला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात अरबाज घराबाहेर पडल्याने निक्कीसह सर्व सदस्यांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातल्या या चॉकलेट बॉय अरबाजने आपल्या ताकदीच्या जोरावर अनेक टास्क जिंकले होते. या आठवड्याचा तो कॅप्टनदेखील होता. अरबाजने त्याच्या पद्धतीने चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून निरोप घेताना अरबाज म्हणाला, “महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मला आपलंसं केलं आहे. माझा प्रवास त्यांनी पाहिला आहे. या खेळात माझं काही चुकलं असं मला वाटलं नाही. निक्कीसोबतची जर्नी खूप छान होती.”

हे सुद्धा वाचा

अरबाज आणि निक्कीमुळे बिग बॉसचा प्रत्येक आठवडा गाजला. बिग बॉसच्या घराबाहेर, सोशल मीडियावरही या दोघांची जोरदार चर्चा झाली. अरबाज आणि निक्कीला घरातून बाहेर काढण्याची मागणी वारंवार प्रेक्षकांकडून होत होती. बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्कीला एकमेकांचा आधार होता. म्हणूनच जेव्हा अरबाज घराबाहेर जाणार हे जाहीर झालं, तेव्हा निक्की ढसाढसा रडू लागली होती. एलिमिनेशनसाठी अरबाज पटेल, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर हे कलाकार नॉमिनेट झाले होते. अरबाज घराबाहेर पडला तर बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅप्टन बाद झाल्याची घटना घडेल, असं बिग बॉसने आधीच स्पष्ट केलं होतं. त्यानुसार बिग बॉस मराठीच्या इतिहासात ही गोष्ट पहिल्यांदाच घडली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.