BB Marathi 5 Winner Suraj Chavan LIVE : ‘गुलिगत धोका’ म्हणत सूरज चव्हाण थेट ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा विजेता

| Updated on: Oct 07, 2024 | 9:31 AM

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Suraj Chavan Winner 2024 LIVE Updates : 'बिग बॉस मराठी सीजन 5'चा आज फिनाले पार पडतोय. फिनालेला सुरूवात झालीये. रितेश देशमुख फिनालेला होस्ट करतोय. मुळात म्हणजे बिग बॉस मराठी सीजन 5 बद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच मोठी क्रेझ बघायला मिळाली.

BB Marathi 5 Winner Suraj Chavan LIVE  : 'गुलिगत धोका' म्हणत सूरज चव्हाण थेट 'बिग बॉस मराठी सीजन 5'चा विजेता
Bigg Boss

‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा फिनाले पार पडलाय. रितेश देशमुख आपल्या खास स्टाईलमध्ये फिनालेला होस्ट करताना दिसलाय. 7o दिवसांनंतर बिग बॉसच्या विजेत्याच्या नावाची घोषणा ही करण्यात आलीये. वोटिंग ट्रेंड देखील पुढे आले होते. बिग बॉसच्या घरात टॉप 6 फायनलिस्ट अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निकी तांबोळी, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर हे पोहोचले. आता सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी सीजन 5’ चा विजेता ठरलाय. सूरजच्या नावाची घोषणा रितेश देशमुख याच्याकडून करण्यात आलाय. सूरज चव्हाण याच्यावर काैतुकांच्या वर्षाव केला जातोय. 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Oct 2024 09:42 PM (IST)

    विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाण मालामाल

    बिग बॉस मराठी सीजन 5 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आलीये. सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विजेता ठरलाय. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून त्याला 14 लाख रूपये बक्षिस म्हणून मिळाले आहेत.

  • 06 Oct 2024 09:24 PM (IST)

    तरूणाईमध्ये सूरज चव्हाण याची प्रचंड क्रेझ

    सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता ठरला असून तरूणाईमध्ये सूरज चव्हाण याच्याबद्दल मोठी क्रेझ सुरूवातीपासूनच बघायला मिळाली.

  • 06 Oct 2024 09:18 PM (IST)

    ‘गुलिगत धोका’ म्हणत सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा विजेता

    बिग बॉस मराठी सीजन 5 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा नुकताच करण्यात आलीये. सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता ठरलाय.

  • 06 Oct 2024 08:37 PM (IST)

    सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठीचा विजेता

    सूरज चव्हाण अखेर ठरला आहे बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता. रितेश देशमुख याने केले विजेत्याच्या नावाची घोषणा

  • 06 Oct 2024 08:32 PM (IST)

    निकी तांबोळी बिग बॉसच्या घराबाहेर

    निकी तांबोळी ही बिग बॉसच्या टॉप 3 पर्यंत पोहोचली. आता बिग बॉसच्या घराच्या बाहेर निकी तांबोळी ही पडली आहे. तिने अगोदरच मान्य केले होते की, ती टॉप 3 मधून बाहेर पडेल.

  • 06 Oct 2024 08:17 PM (IST)

    कोण पडणार बिग बॉसच्या विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर?

    आता बिग बॉसच्या घरात टॉप 3 मध्ये सूरज चव्हाण, निकी तांबोळी आणि अभिजीत सावंत हे आहेत. या तिघांपैकी एकजण बिग बॉसचा विजेता होणार आहे. लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय.

  • 06 Oct 2024 08:09 PM (IST)

    आलिया भट्ट पोहोचली बिग बॉस मराठीच्या मंचावर

    बिग बॉस मराठी सीजन 5 चा फिनाले सुरू असून आलिया भट्ट ही बिग बॉस मराठी सीजन 5 च्या मंचावर पोहोचली आहे. जिगरा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया भट्ट ही पोहोचली आहे.

  • 06 Oct 2024 07:54 PM (IST)

    धनंजय पोवारच्या पत्नीला हुंदके अनावर

    पती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर धनंजय पोवारच्या पत्नीला आपले हुंदके अनावर झाले. धनंजयची पत्नी थेट बिग बॉसच्या घरात रडताना दिसली. यावेळी धनंजय पत्नीला समजून सांगताना देखील दिसला.

  • 06 Oct 2024 07:53 PM (IST)

    अभिजीत सावंत पोहोचला ‘टॉप 3’मध्ये

    अभिजीत आणि सूरज चव्हाण हे टॉप 3 मध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबिय देखील त्यांच्यासोबत आहेत.

  • 06 Oct 2024 07:48 PM (IST)

    अरबाज पटेलचा धमाकेदार डान्स

    अरबाज पटेल याने बिग बॉस फिनालेमध्ये धमाकेदार असा डान्स केलाय. लोकांना अरबाजचा डान्स आवडलाय.

  • 06 Oct 2024 07:41 PM (IST)

    अंकिता वालावलकर हिचा प्रवास बिग बॉसच्या घरातील संपला

    फिनालेला सुरूवात झाली असून अंकिता वालावलकर हिचा आता बिग बॉसच्या घरातील प्रवास संपवला आहे. निकी तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण हे टॉप 4 मध्ये पोहोचले आहेत.

  • 06 Oct 2024 07:23 PM (IST)

    निकी तांबोळी हिच्याबद्दल मोठी भविष्यवाणी

    बिग बॉसचा फिनाले सुरू असून घरात आता ज्योतिषीचे आगमन झाले असून निकी तांबोळी ही बिग बॉसच्या टॉप 3 पर्यंत असू असते असे सांगण्यात आलंय. आता खरोखरच निकी तांबोळी ही टॉप 3 पर्यंत जाऊन शकते का..

  • 06 Oct 2024 07:13 PM (IST)

    वैभव आणि इरीनाचा धमाकेदार डान्स

    बिग बॉसच्या फिनालेमध्ये वैभव आणि इरीनाने धमाकेदार डान्स केलाय. विशेष म्हणजे दोघांनीही अत्यंत रोमांटिक होत हा डान्स केलाय.

  • 06 Oct 2024 07:02 PM (IST)

    बिग बॉसला मिळाले टॉप 5 फायनलिस्ट

    जान्हवी किल्लेकर हिचा आता बिग बॉसच्या घरातील प्रवास संपलाय. आता बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, निकी तांबोळी आणि धनंजय पोवार हे आहेत.

  • 06 Oct 2024 06:59 PM (IST)

    जान्हवी किल्लेकरचा प्रवास संपला

    फिनालेला सुरूवात झालीये. टॉप 6 स्पर्धकांमधून जो आता बाहेर पडेल त्याला नऊ लाखांची रक्कम मिळणार आहे. आता नऊ लाख रूपये घेऊन जान्हवी ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे.

  • 06 Oct 2024 06:57 PM (IST)

    बिग बॉस मराठी सीजन 5 : बिग बॉसच्या निर्मात्यांची मोठी खेळी

    बिग बॉसच्या निर्मात्यांनी मोठी खेळी खेळल्याचे बघायला मिळतंय. टॉप 6 पैकी जो व्यकी आता बाहेर मनाने पडेल त्याला नऊ लाख रूपये मिळणार आहेत.

  • 06 Oct 2024 06:42 PM (IST)

    निकी तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांचा धमाकेदार डान्स

    फिनालेमध्ये जान्हवी किल्लेकर आणि निकी तांबोळी यांनी केला आहे अत्यंत जबरदस्त डान्स. आज की रात्र गाण्यावर जान्हवी आणि निकीने डान्स केलाय.

  • 06 Oct 2024 06:40 PM (IST)

    सलमान खानने दिले रितेश देशमुखला मोठे गिफ्ट

    नुकताच सलमान खान याने एक व्हिडीओ शेअर करत रितेश देशमुख याला शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओच्या माध्यमातून सलमान खान याने शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 06 Oct 2024 06:35 PM (IST)

    रितेशला दिले निर्मात्यांनी अत्यंत मोठे गिफ्ट

    फिनालेमध्ये बिग बॉसच्या निर्मात्यांनी रितेश देशमुख याला अत्यंत मोठे गिफ्ट दिले आहे. निर्मात्यांकडून थेट रितेश देशमुख याचाच संपूर्ण प्रवास सीजनमधील दाखवण्यात आलाय.

  • 06 Oct 2024 06:30 PM (IST)

    ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा फिनाले : निर्मात्यांनी केले रितेश देशमुख याचे काैतुक

    काही व्हिडीओ दाखवत बिग बॉसच्या निर्मात्यांनी रितेश देशमुख याचे काैतुक केले. या व्हिडीओमध्ये लोक भाऊच्या धक्क्याबद्दल बोलताना देखील दिसले आहेत.

  • 06 Oct 2024 06:12 PM (IST)

    सलमान खान आणि रितेश देशमुख एकाच मंचावर

    ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा आज फिनाले पार पडतोय. फिनालेसाठी आता सलमान खान हा देखील रितेशसोबत मंचावर पोहोचला आहे.

  • 06 Oct 2024 06:09 PM (IST)

    टॉप 6 फायनलिस्टचे धमाकेदार डान्स

    बिग बॉसच्या घरातील टॉप 6 फायनलिस्ट धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत.

  • 06 Oct 2024 06:04 PM (IST)

    रितेश देशमुख याने केला अखेर ‘तो’ मोठा खुलासा

    दोन आठवडे आपण शोमध्ये का पोहचू शकलो नाही हे सांगताना रितेश देशमुख हा दिसलाय. रितेश म्हणाला की, माझे विदेशात शूटिंग सुरू असल्याने मला दोन आठवड्यांमध्ये येता आले नाही.

  • 06 Oct 2024 05:59 PM (IST)

    ‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या फिनालेला सुरूवात

    बिग बॉसच्या फिनालेला सुरूवात झालीये. स्पर्धकांचा प्रवास दाखवला जातोय.

  • 06 Oct 2024 05:31 PM (IST)

    Bigg boss marathi : रितेश देशमुख काैतुक

    रितेश देशमुख याने बिग बॉस मराठी सीजन 5 ला होस्ट केले असून त्याचे काैतुक चाहत्यांकडून केले जातंय.

  • 06 Oct 2024 05:19 PM (IST)

    Bigg Boss Marathi LIVE : काही वेळातच होणार बिग बॉस मराठीच्या फिनालेला सुरूवात

    6 वाजता बिग बॉस मराठी सीजन 5 च्या फिनालेला सुरूवात होणार आहे.

  • 06 Oct 2024 04:56 PM (IST)

    अभिजीत सावंत जबरदस्त लूकमध्ये

    अभिजीत सावंत हाच बिग बॉस मराठीचा विजेता होणार असल्याचे सांगितले जातंय. त्यामध्ये आता प्रोमोमध्ये अभिजीत सावंत हा जबरदस्त लूकमध्ये दिसलाय.

  • 06 Oct 2024 04:42 PM (IST)

    सोशल मीडियावर ‘तो’ प्रोमो व्हायरल

    बिग बॉसचे टॉप 6 फायनलिस्ट बिग बॉसच्या फिनालेमध्ये धमाल करताना दिसत आहेत.

  • 06 Oct 2024 04:37 PM (IST)

    बिग बॉस मराठी सीजन ५ : फिनालेमध्ये निकी तांबोळी आणि जान्हवी किल्लेकरचा जलवा

    फिनालेमध्ये जान्हवी आणि निकी तांबोळी यांच्या डान्सचा जलवा बघायला मिळेल.

  • 06 Oct 2024 04:20 PM (IST)

    28 जुलैपासून झाली होती ‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या पर्वाला सुरूवात

    बिग बॉस मराठी सीजन ५ चा आज फिनाले असून 70 दिवसांनंतर हा शो संपत आहे. 28 जुलैपासून बिग बॉस मराठीला सुरूवात झाली होती.

  • 06 Oct 2024 04:09 PM (IST)

    बिग बॉस मराठी : वोटिंग ट्रेंडमध्ये करतोय हा स्पर्धक धमाका

    वोटिंग ट्रेंडमध्ये सूरज चव्हाण हाच धमाका करताना दिसतोय. तो सतत आघाडीवर असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

  • 06 Oct 2024 03:56 PM (IST)

    वोटिंग ट्रेंडनंतर निर्मात्यांवर थेट हे मोठे आरोप 

    वोटिंग ट्रेंडनुसार सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांच्यात टक्कर बघायला मिळतंय. मात्र, लोकांनी यावरून आता निर्मात्यांवर अनेक आरोप करण्यास सुरूवात केलीये. 

  • 06 Oct 2024 03:50 PM (IST)

    अरबाज खानने घरात येत केला मोठा खुलासा

    अरबाज खान हा नुकताच बिग बॉसच्या घरात परत इतर सदस्यांसोबत आला. यावेळी त्याने निकी तांबोळी हिच्याजवळ काही मोठे खुलासे केले.

  • 06 Oct 2024 03:43 PM (IST)

    कोण होणार ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा विजेता जाणून घ्या मोठे अपडेट

    सूरज चव्हाण हाच बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता होणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

  • 06 Oct 2024 03:32 PM (IST)

    Bigg Boss Marathi Season 5 : काय म्हणतोय बिग बॉस मराठीचा वोटिंग ट्रेंड…

    बिग बॉस मराठीच्या वोटिंग ट्रेंडनुसार सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विजेता होईल तर अभिजीत सावंत हा उपविजेता होईल. 

  • 06 Oct 2024 03:27 PM (IST)

    नेमकी कधी होणार फिनालेला सुरूवात

    बिग बॉस मराठीचा Grand Finale 6 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर आपल्याला हा फिनाले पाहता येईल.

  • 06 Oct 2024 03:23 PM (IST)

    ‘या’ दोन स्पर्धकांमध्ये आहे काटे की टक्कर

    सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांच्यामध्ये जोरदार टक्कर बघायला मिळतंय. सूरज आणि अभिजीतच बिग बॉसचे टॉप 2 फायनलिस्ट होणार असल्याची चर्चा आहे.

  • 06 Oct 2024 03:21 PM (IST)

    ‘हे’ आहेत बिग बॉसचे टॉप फायनलिस्ट

    अंकिता वालावकर, अभिजीत सावंत, निकी तांबोळी, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार

  • 06 Oct 2024 03:19 PM (IST)

    Bigg Boss Marathi Season 5 : कोण ठरणार ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा विजेता?

    आज बिग बॉस मराठी सीजन 5 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल. अवघ्या काही तासांमध्येच फिनालेला सुरूवात होईल.

Published On - Oct 06,2024 3:17 PM

Follow us
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.