Bigg Boss OTT 2 | अभिषेक मल्हान VS एल्विश यादव; पैसा-प्रसिद्धीमध्ये कोण पुढे? कोणाचे जास्त फॉलोअर्स?
अभिषेक मल्हान हा पहिल्या दिवसापासून जरी सोशल मीडियावर चर्चेत असला तरी फिनालेच्या आठवड्यापर्यंत त्याचीच खेळी त्याच्यावर भारी पडताना दिसतेय. त्याचा अहंकार आणि अतिआत्मविश्वास यशाच्या मार्गातील अडथळा बनू शकतो.
मुंबई | 8 ऑगस्ट 2023: आता फक्त सहा दिवसांची प्रतीक्षा आणि त्यानंतर प्रेक्षकांना मिळणार ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सिझनचा विजेता. बिग बॉसच्या घरात सध्या टॉप सहा स्पर्धक आहेत आणि या सर्व स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठीची चुरस रंगली आहे. अभिषेक मल्हान, पूजा भट्ट, मनीषा राणी, एल्विश यादव, जिया शंकर आणि बेबिका धुर्वे यांच्यापैकी एक स्पर्धक विजेतेपदावर आपलं नाव कोरणार आहे. सोशल मीडियावरील ट्रेंड पाहता अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव या दोन स्पर्धकांमध्ये अंतिम चुरस रंगू शकते. या दोघांपैकी कोणाचं पारडं जड आहे, कोणाचा स्टारडम मोठा आहे ते पाहुयात..
अभिषेक VS एल्विश
अभिषेक मल्हानचे इन्स्टाग्रामवर 4.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर दुसरीकडे एल्विशचे इन्स्टाग्रामवर 11.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर एल्विश अभिषेकच्या खूप पुढे आहे. युट्यूबचा विचार केला तर एल्विशचे 17 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत आणि फेसबुकवर त्याचे 4.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. दुसरीकडे ‘फुकरा इन्सान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेकचे युट्यूबवर 7.42 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहे. मात्र अभिषेकचे युट्यूबवर तीन विविध चॅनल्स आहेत. फुकरा इन्सान लाइव्ह (2.18 दशलक्ष सबस्क्राइबर्स), मल्हान रेकॉर्ड्स (292K सबस्क्राइबर्स), फुकरा इन्सान शॉर्ट्स (527K सबस्क्राइबर्स) अशी त्यांची नावं आहेत. अभिषेकचा भाऊ आणि आईसुद्धा व्लॉगर आहेत. आई डिंपल मल्हानचे 2.37 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत तर भाऊ निश्चय ट्रिगर्ड इन्सान या नावाने युट्यूब चॅनल चालवतो. त्याचे 19.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
दोघांची कमाई किती?
अभिषेक मल्हान त्याच्या युट्यूब चॅनलद्वारे दर महिन्याला जवळपास 10 ते 12 लाख रुपये कमावतो. तो संगीतकारसुद्धा आहे. त्याची एकूण संपत्ती दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याचं कळतंय. तर दुसरीकडे एल्विश हा व्लॉगिंगसोबत स्वत: क्लोथिंग ब्रँडसुद्धा चालवतो. त्याचीही संपत्ती दोन कोटी रुपयांच्या घरात आहे. एल्विशकडे आलिशान गाड्यांचंही कलेक्शन आहे.
कोण पटकावणार विजेतेपद?
अभिषेक मल्हान हा पहिल्या दिवसापासून जरी सोशल मीडियावर चर्चेत असला तरी फिनालेच्या आठवड्यापर्यंत त्याचीच खेळी त्याच्यावर भारी पडताना दिसतेय. त्याचा अहंकार आणि अतिआत्मविश्वास यशाच्या मार्गातील अडथळा बनू शकतो. याच गोष्टीचा फायदा एल्विशला मिळू शकतो आणि तो विजेतेपद पटकावू शकतो.