Bigg Boss OTT 2 | ग्रँड फिनालेआधी बिग बॉसच्या स्पर्धकांना धक्का; एकाच वेळी दोन स्पर्धक झाले बेघर

या आठवड्यात चार स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले होते. यामध्ये जिया शंकर, मनीषा राणी, बेबिका धुर्वे आणि जद हदिद यांचा समावेश होता. या चौघांपैकी दोन स्पर्धक फिनालेच्या शर्यतीतून बाद झाले आहेत.

Bigg Boss OTT 2 | ग्रँड फिनालेआधी बिग बॉसच्या स्पर्धकांना धक्का; एकाच वेळी दोन स्पर्धक झाले बेघर
BIGG BOSS OTT 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 10:41 AM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी 2’ सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. येत्या 14 ऑगस्ट रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजेता घोषित करण्यासाठी शेवटच्या आठवड्यात चाहते जबरदस्त वोटिंग करत आहेत. या आठवड्यात चार स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले होते. यामध्ये जिया शंकर, मनीषा राणी, बेबिका धुर्वे आणि जद हदिद यांचा समावेश होता. या चौघांपैकी दोन स्पर्धक फिनालेच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. या स्पर्धकांची नावं ऐकून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

निर्मात्यांनी 6 ऑगस्ट रोजी ‘वीकेंड का वार’ या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित केला होता. यामध्ये सूत्रसंचालक सलमान खान हा नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांची नावं घेतो. त्यानंतर कमी मतं मिळालेल्या दोन स्पर्धकांना घराबाहेर जाण्यास सांगतो. हे दोन स्पर्धक कोण आहेत, ते या प्रोमोमध्ये स्पष्ट करण्यात आलं नाही. मात्र रविवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये अविनाश सचदेव आणि जद हदिद हे दोघं बेघर झाल्याचं पहायला मिळालंय. या दोघांना इतरांपेक्षा कमी मतं मिळाली.

हे सुद्धा वाचा

वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमानने घरातील स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. “तुम्हा सर्वांना काय वाटतं, की फिनालेपर्यंत पोहोचणं खूप सोपं असेल? फिनालेपर्यंत आल्यावर आज बिग बॉसच्या घरात डबल एलिमिनेशन होणार आहे. या दोन्ही स्पर्धकांना कमी मतं मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे,”, असं सलमान म्हणाला.

अविनाश आणि जद बाद झाल्यानंतर आता बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक राहिले आहेत. यामध्ये एल्विश यादव, अभिषेक मल्हान, मनीषा राणी, पूजा भट्ट, जिया शंकर आणि बेबिका धुर्वे यांचा समावेश आहे. बिग बॉस ओटीटी 2 चा ग्रँड फिनाले येत्या 14 ऑगस्ट रोजी जिओ सिनेमावर रात्री 9 वाजल्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर विजेत्याबद्दल विविध अंदाज वर्तवले जात आहेत. अखेरच्या टप्प्यात एल्विश आणि अभिषेक या दोघांमध्ये टक्कर होणार असल्याचा दावा काही नेटकरी करत आहेत. तर टॉप 3 स्पर्धकांमध्ये जिया शंकर किंवा मनीषा राणी असू शकते, असंही म्हटलं जात आहे. अभिषेक मल्हान हा बिग बॉसच्या घरातील शेवटचा कॅप्टन आणि फिनालेमध्ये पोहोचणारा पहिला स्पर्धक ठरला होता.

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.