Bigg Boss OTT 2 | बिग बॉसच्या घरात जिया शंकरचा कारनामा; एल्विशला पाजलं साबणाचं पाणी, भडकले नेटकरी

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी जिया शंकरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 'शेम ऑन जिया' असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. 'कोणी इतकं वाईट कसं असू शकतं', असं एकाने लिहिलं आहे. तर 'ही अत्यंत वाईट वागणूक आहे', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

Bigg Boss OTT 2 | बिग बॉसच्या घरात जिया शंकरचा कारनामा; एल्विशला पाजलं साबणाचं पाणी, भडकले नेटकरी
Jiya Shankar and Elvish YadavImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 9:20 PM

मुंबई | 18 जुलै 2023 : ‘बिग बॉसच्या ओटीटी 2’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यापासून एल्विश यादव अनेकांशी भांडताना दिसतोय. याआधी अविनाश सचदेवसोबत त्याचं जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर फलक नाज आणि एल्विश यांच्यात वाद झाला. आता जिया शंकर आणि एल्विश यांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जिया आणि एल्विश यांच्यातील बाचाबाची पहायला मिळतेय. तर आणखी एका व्हिडीओमध्ये जिया एल्विशच्या पिण्याच्या पाण्यात साबण मिसळण्याबाबत अविनाशसोबत बोलताना दिसतेय. हे ऐकून नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

यावरूनच जिया शंकर आणि एल्विश एकमेकांशी भांडतात. बिग बॉसच्या घरातील एका टास्कदरम्यान जेव्हा एल्विश जियाला पिण्यासाठी पाणी मागतो, तेव्हा ती त्या पाण्यात हँडवॉश मिसळते. यावरून एल्विशचा राग अनावर होतो आणि तो तिला म्हणतो, “तुझ्या घरात हँडवॉश मिसळून पाणी पित असतील.” त्यावर जिया भडकून त्याला म्हणते, “माझ्या घरच्यांविषयी काही बोलू नकोस.”

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी जिया शंकरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘शेम ऑन जिया’ असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. ‘कोणी इतकं वाईट कसं असू शकतं’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘ही अत्यंत वाईट वागणूक आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘एकतर पिण्याच्या पाण्यात हँडवॉश मिसळलं आणि नंतर स्वत:च त्याला उलट उत्तर देतेय’, अशा शब्दांनी नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात जिया शंकर, अविनाश सचदेव, फलक नाज, एल्विश यादव, आशिका भाटिया आणि जद हदिद हे स्पर्धक बाद होण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.

सलमान सोडणार शो?

गेल्याच्या गेल्या आठवड्यात जेव्हा वीकेंड का वार हा खास एपिसोड प्रसारित झाला, तेव्हा सूत्रसंचालक सलमान खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये त्याच्या हातात सिगारेट पहायला मिळाली. यावरूनच सलमान बिग बॉसच्या प्रॉडक्शन टीमवर जोरदार भडकला होता, असं कळतंय. याच कारणामुळे त्याने शो सोडल्याचंही म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर सलमान फक्त ओटीटी व्हर्जन नाही तर टीव्ही व्हर्जनवरील बिग बॉसचंही सूत्रसंचालन करणार नसल्याचं समजतंय.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.