AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss OTT 2 : 80च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीची बिगबॉसमध्ये एन्ट्री; यांचही झालं आगमन

लोकप्रिय शो बिग बॉस ओटीटी 2 कालपासून सुरू झाला आहे. या शोचा काल ग्रँड प्रिमियर पार पडला. या शोमध्ये बड्या कलाकारांनी भाग घेतला आहे. तसेच टीव्हीवरील कलाकारही या शोमध्ये सहभागी झाले आहेत.

Bigg Boss OTT 2 : 80च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीची बिगबॉसमध्ये एन्ट्री; यांचही झालं आगमन
Bigg Boss OTT 2Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 6:35 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वात हिट शो बिग बॉस आता ओटीटीवर आला आहे. बिग बॉस ओटीटी-2 सीजन कालपासून सुरू झाला आहे. कोरोना काळात आलेलं हे बिग बॉसचं हे डिजिटल व्हर्जन प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे. या शोचं होस्टिंग सलमान खान करत आहे. या शोची खासियत म्हणजे या शोमध्ये 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री भाग घेणार आहे. तिची स्पर्धा आलिया सिद्घीकी आणि घरातील स्पर्धकांशी होणार आहे. त्यामुळे या ओटीटीवरील शोकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्ट ही बिग बॉस ओटीटी-2मधील 13 वी कंटेस्टेंट आहे. पूजाही बिग बॉसच्या घरातील शोमध्ये दिसणार आहे. पूजा भट्टचं या शोमध्ये असणं हे बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी सरप्राईज असणार आहे. पुनीत सुपरस्टारनेही बिग बॉस ओटीटी -2मध्ये एन्ट्री घेतली आहे. पुनीत सुपरस्टार हा सोशल मीडिया कंटेट क्रिएटर आणि कॉमेडियन आहे. एंटरटेनमेंटसाठी तो बिकिनी घालायलाही मागे पुढे पाहत नाही. अनेक व्हिडीओत तो बिकिनी घालून बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

हे स्पर्धक वेटिंगवर

आकांक्षा पुरी आणि पलक पुरसवानी हे दोन्ही स्पर्धक सध्या वेटिंगवर आहेत. सलमान खान आणि जजनी या दोघांना होल्डवर ठेवलं आहे. त्यांना स्टेजवरच रोखून ठेवण्यात आलं आहे.

त्याची एक्स गर्लफ्रेंड आली

अविनाश सचदेवची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री पलक पुरसवानीनेही शोमध्ये एन्ट्री घेतली आहे. अविनाश आणि ती रिलेशनमध्ये होती. आता दोघांमध्ये काहीच संबंध नाही. घरात ते एकमेकांपासून लांब राहणार आहेत. सलमान खानने पलकला तिच्या एका चुकीसाठी फटकारलंही आहे. पलकने बिग बॉसच्या घरातील नियम मोडला आहे. तिने बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी बिगबॉसमध्ये जात असल्याचं आपल्या मित्रांना सांगितलं होतं. तसेच मित्रांना वोटिंग करण्याचं आवाहनही केलं होतं.

बेबिकाही बिग बॉसच्या घरात

प्रसिद्ध ज्योतिषाची मुलगी डेंटिस्ट बेबिकाही बिग बॉसच्या घरात आली आहे. मी केवळ प्रेमासाठी या घरात आले नाही. माझ्या मागे आजही मुलांची रांग लागते. मला फेल होण्याची भिती नाही. पश्चातापाची भिती वाटते, असं तिने सांगितलं. बेबिका डेंटिस्ट आहे. अभिनेत्री आहे. ज्योतिषी आहे. तसेच ती फेस रिडरही आहे.

नवाजच्या आधीच्या पत्नीची एन्ट्री

नवाजुद्दीन सिद्दीकी यांची पूर्वाश्रमीची पत्नी आलिया सिद्दीकीनेही बिग बॉसमध्ये भाग घेतला आहे. आता माझी मुलं मोठी झाली आहेत. मलाही आनंदी राहण्याचा अधिकार आहे. नवाजने मला या शोमध्ये जाण्यास सांगितलं आहे. तो दीड महिन्यांसाठी मुलांना पॅरिसला घेऊन जाणार आहेत, असं आलियाने सांगितलं. याशिवाय आकांक्षा पुरीनेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. यावेळी पूजा भट्ट, सनी लिओनी आणि देबांग हे तिघेही जज बनले होते. यावेळी त्यांनी अभिषेकला काही प्रश्नही विचारले होते.

पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....