दोन वर्षांपासून बिग बॉसला मिळतायत धमक्या; कॉलवर देतात शिव्या, प्रसिद्ध स्पर्धक ठरतोय कारण

2006 मध्ये बिग बॉसचा पहिला एपिसोड टेलिव्हिजनवर प्रसारित झाला होता. गेल्या 17 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याला भरभरून प्रतिसाददेखील मिळत आहे. या 17 वर्षांत बिग बॉसची एकमेव गोष्ट बदलली नाही, तो म्हणजे आवाज. विजय विक्रम सिंह बिग बॉसला आपला आवाज देतात.

दोन वर्षांपासून बिग बॉसला मिळतायत धमक्या; कॉलवर देतात शिव्या, प्रसिद्ध स्पर्धक ठरतोय कारण
बिग बॉसचा व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट विजय विक्रम सिंहImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 11:23 AM

मुंबई : 2 डिसेंबर 2023 | ‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो आहे. या शोवरून बरेच वाद होत असतानाही त्याची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. सध्या या शोचा 17 वा सिझन सुरू आहे. या 17 वर्षांत बिग बॉस या शोमधील बऱ्याच गोष्टी बदलल्या, पण एक अशी गोष्ट आहे जी अद्याप बदलली नाही. ती म्हणजे बिग बॉसचा आवाज. बिग बॉसच्या आवाजाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. सध्या बिग बॉसला आपला आवाज देणारे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट विजय विक्रम सिंह एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.

‘बिग बॉस’ला शिवीगाळ, धमक्या

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत विजय विक्रम सिंह यांनी त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी मोकळेपणे सांगितल्या. याच मुलाखतीत त्यांनी असाही खुलासा केला की गेल्या दोन वर्षांपासून त्यांना लोकांकडून धमक्या मिळत आहेत आणि कॉलवर शिवीगाळ केली जात आहे. विजय विक्रम सिंहने यावेळी हेसुद्धा स्पष्ट केलं की ते स्वत: बिग बॉस नाहीत तर ते फक्त शोचे निवेदक आहेत. मात्र लोकांना असं वाटतं की तेच खरे बिग बॉस आहेत. म्हणूनच जेव्हा शोमधून एखादा लोकप्रिय स्पर्धक किंवा चाहत्यांचा आवडता स्पर्धक बाद होतो, तेव्हा लोक विजय विक्रम सिंह यांना शिवीगाळ करू लागतात.

गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड ट्रोलिंग

“गेल्या दोन वर्षांपासून मी ट्रोलिंगचा खूप सामना केला आहे. एखादा लोकप्रिय स्पर्धक बाद झाल्यानंतर मला खूप शिवीगाळ केली गेली. त्यांना असं वाटतं की मीच बिग बॉस आहे आणि मीच स्पर्धकांना घराबाहेर काढतोय. पण ही गोष्ट मी त्यांना अनेकदा समजावली की मी स्पर्धकांना बाद करत नाही. तो अधिकार माझ्याकडे नाही. स्पर्धक प्रेक्षकांच्या मतदानाच्या आधारावर घराबाहेर जातात’, असं त्यांनी स्पष्ट केलं. विजय विक्रम सिंह यांनी असंही सांगितलं की केवळ त्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबीयांनाही धमक्या मिळतात.

हे सुद्धा वाचा

खरा बिग बॉस कोण?

खरा बिग बॉस कोण आहे, त्यांना आदेश कोण देतो याबद्दलची माहिती विजय विक्रम सिंह यांनासुद्धा नाही. तो एखादा व्यक्ती आहे की मशीन याचीही त्यांनी माहिती नाही. जरी बिग बॉस एखादी व्यक्ती असली तरी ती फक्त तिचं काम करतेय, असंही ते म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.