Birthday Special | आदर्श वाटावा असा ‘फॅमिली मॅन’ इमरान हाश्मी, किसिंग सीनवर अशी असते पत्नीची प्रतिक्रिया!

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आज आपला 42वा वाढदिवस साजरा करत आहेत. इमरानने आपल्या करिअरची सुरुवात 'फुटपाथ' या चित्रपटाने केली होती.

Birthday Special | आदर्श वाटावा असा ‘फॅमिली मॅन’ इमरान हाश्मी, किसिंग सीनवर अशी असते पत्नीची प्रतिक्रिया!
इमरान हाश्मी
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 10:38 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आज आपला 42वा वाढदिवस साजरा करत आहेत. इमरानने आपल्या करिअरची सुरुवात ‘फुटपाथ’ या चित्रपटाने केली होती. मात्र, ‘मर्डर’ आणि ‘गँगस्टर’सारख्या चित्रपटांमुळे तो लोकप्रिय झाला. इमरानला बॉलिवूडमध्ये ‘सिरियल किसर’ म्हणून ओळखले जाते. परंतु, खऱ्या आयुष्यात इमरान आपल्या ऑनस्क्रीन प्रतिमेच्या अगदी विरुद्ध आहे. इमरान एक परिपूर्ण कौटुंबिक व्यक्ती आहे (Birthday Special Story Emraan Hashmi a complete family man).

इमरानच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल प्रत्येकाला माहिती आहे, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणालाही फारसे माहिती नाही. आज त्याच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने आपण त्याची आणि पत्नी परवीनच्या प्रेमकथेविषयी जाणून घेऊया.. इमरान आणि परवीन दोघेही शाळा व महाविद्यालयात एकत्र होते. आधी दोघे एकमेकांचे मित्र बनले आणि मग दोघांची ही मैत्री पुढे प्रेमात बदलली. जवळपास 6 वर्षांच्या नात्यानंतर इमरान आणि परवीनने लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळी इमरान आपल्या करिअरमध्ये व्यस्त होता आणि त्यानंतर दोघांनी 2006मध्ये लग्न केले.

इमरानच्या किसिंग सीनवर कशी असते परवीनची प्रतिक्रिया?

इमरानचे किसिंग आणि बोल्ड सीन पाहून सुरुवातीला परवीन थोडी नाराज झाली होती, पण नंतर तिला समजले की हा इमरानच्या कामाचा एक भाग आहे. करण जोहरच्या शो कॉफी विथ करणमध्ये इमरानने सांगितले होते की, जेव्हा परवीनने मर्डर चित्रपटात इमरान आणि मल्लिका शेरावतचे बोल्ड दृश्य पाहिले, तेव्हा तिने रागाने इमरानचा हात इतक्या जोराने धरला की, तिचे नखे इमरानच्या हातात रुतली. इमरानच्या हाताला रक्तस्त्राव होऊ लागला. ती चिडून म्हणाली, तू काय करतोस हे? मला याबद्दल आधी काहीही का सांगितले नाही? मात्र, त्यानंतर तिने समजून घेतले (Birthday Special Story Emraan Hashmi a complete family man).

परवीनबरोबर इमरानचे डील!

यानंतर इम्रानने सांगितले की, त्याने आपल्या पत्नीशी करार केला आहे की जेव्हा जेव्हा आपण चित्रपटात किसिंग सीन किंवा बोल्ड सीन देईल, तेव्हा तो पत्नीला महागडी भेटवस्तू देईल. अशाप्रकारे परवीनकडे आता अनेक महागड्या बॅग आहेत. परवीनने इमरानला खूप साथ दिली आहे. इतकेच नाही, तर दोघांनीही एकत्र राहून प्रत्येक कठीण प्रसंगावर मात केली आहे.

चित्रपटांबद्दल पत्नीचा सल्ला घेतो इमरान

अलीकडे एका मुलाखतीदरम्यान इमरानला विचारले गेले होते की, तो आपल्या पत्नीशी चित्रपटांबद्दल बोलतो का?, तर अभिनेता म्हणाला, ‘हो, जेव्हा जेव्हा मी स्क्रिप्ट वाचतो तेव्हा मी परवीनचा दृष्टिकोनही विचारात घेतो. पण, मी हे कधीच विचारत नाही की, तो केला पाहिजे की नाही? चित्रपट करायचा की, नाही हा सर्वस्वी माझा निर्णय असतो.’

(Birthday Special Story Emraan Hashmi a complete family man)

हेही वाचा :

Video |  फिटनेसकडे बारकाईने लक्ष देतेय ‘धोनी’ गर्ल दिशा पाटनी, पाहा तिचा वर्कआऊट व्हिडीओ…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.