Birthday Special | ‘क्रिमिनल सायकॉलॉजी’कडे वळायचं होतं पण अभिनयक्षेत्रात आली हरभजनची पत्नी, वाचा गीता बसराबद्दल…

बॉलिवूड इंडस्ट्रीत अगदी कमी वेळात स्वतःचे स्थान मिळवणारी गीता बसरा आज तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 13 मार्च 1984 रोजी इंग्लंडच्या पोर्ट्समाऊथ येथे झाला होता.

Birthday Special | ‘क्रिमिनल सायकॉलॉजी’कडे वळायचं होतं पण अभिनयक्षेत्रात आली हरभजनची पत्नी, वाचा गीता बसराबद्दल...
गीता बसरा
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 11:04 AM

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि क्रिकेटर हरभजन सिंगची पत्नी गीता बसराला सगळेच लोक ओळखतात. आजही तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. ती मागील बर्‍याच काळासाठी रुपेरी पडद्यापासून दूर आहे, परंतु तिची प्रसिद्धी अजूनही तसूभरही कमी झालेली नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीत अगदी कमी वेळात स्वतःचे स्थान मिळवणारी गीता बसरा आज तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 13 मार्च 1984 रोजी इंग्लंडच्या पोर्ट्समाऊथ येथे झाला होता (Birthday Special Story know about Harbhajan Singh wife actress Geeta Basra).

गीता ही विदेशात जन्मली असली तरी, तिचे हृदय नेहमीच भारतीय राहिले आहे. म्हणूनच तिचे लहानपणापासूनच बॉलिवूड चित्रपटांशी खास नाते आहे. तथापि, सुरुवातीच्या काळात तिला नायिका बनून अभिनय क्षेत्रात नाही तर, ‘क्रिमिनल सायकॉलॉजी’ शिकून त्याच क्षेत्रात पुढे जायचे होते. गुन्हेगारांच्या मनात नेमके काय चालले आहे, त्यांनी नेमकं काय केलंय, ते गीताला जाणून घ्यायचे होते. त्यांची मानसिक स्थिती काय आहे? यावर तिला अभ्यास करायचा होता. गीताने या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता, पण नशीब काहीतरी वेगळंच होतं.

शाळेत असतानाच अभिनयक्षेत्रात पदार्पण

सुरुवातीच्या काळात गीता बसराला ‘क्रिमिनल सायकॉलॉजीस्ट बनण्याची खूप इच्छा होती, परंतु तिच्यात लहानपणापासूनच अभिनयाचे गुण होते. जेव्हा, ती शाळेत शिकत होती, तेव्हाच तिने थिएटर जॉईन केले. येथूनच तिचा अभिनयाचा पाया भक्कम. नंतर तिने मनोरंजन विश्वात आपले करियर बनवण्याचा निर्णय घेतला (Birthday Special Story know about Harbhajan Singh wife actress Geeta Basra).

पाहा गीता बसराचे फोटो

View this post on Instagram

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

(Birthday Special Story know about Harbhajan Singh wife actress Geeta Basra)

बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागला नाही!

बॉलिवूड इंडस्ट्रीत नवीन येणाऱ्याला आपले बळकट स्थान बनवणे वाटते तितके सोपे नाही. अशा लोकांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, गीता स्वत:ला या बाबतीत खूप भाग्यवान मानते. यापूर्वी तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, आपल्याला इंडस्ट्रीमध्ये खूप चांगले लोक मला लाभले. ज्यामुळे मला काम मिळण्यात कोणतीही अडचण आली नाही. गीताने ‘द ट्रेन’, ‘मिस्टर जॉब’ आणि ‘सेकंड हँड हसबंड’ सारख्या चित्रपटात काम केले आहे.

वडिलांच्या दुकानावर करते सर्व्हिसिंगचे काम!

गीता कदाचित जगासाठी खूप लोकप्रिय असेल, परंतु ती प्रसिद्ध झाल्यानंतरही अद्याप मातीशी नाळ जोडून ठेवलेली व्यक्ती आहे. आताही जेव्हा ती पोर्ट्समाऊथमधील वडिलांच्या दुकानामध्ये जाते, तेव्हा ती सर्व्हिसिंगचे काम देखील करते. हे स्वत: तिच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

(Birthday Special Story know about Harbhajan Singh wife actress Geeta Basra)

हेही वाचा :

‘Slumdog Millionaire’ फेम मधुर मित्तलला कोर्टाचा दिलासा, मैत्रिणीने केलेला शोषणाचा आरोप

Video | राणादाच्या पाठक बाई म्हणतायत, ‘हम है नये, अंदाज क्यू हो पुराना?’, पाहा व्हिडीओ…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.