प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हत्येतील मुख्य आरोपीला जामीन मंजूर, सुनावणीमध्ये नक्की झालं तरी काय?
टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर, गेल्या वर्षी निधन झाल्यामुळे माजली होती सर्वत्र खळबळ...

मुंबई : गेल्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री, टिकटॉक स्टार आणि भाजप महिला नेत्याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. भाजप नेत्याचं निधन हृदयविकाराच्या झटक्यानं झालं… असं सुरुवातीला सांगण्यात आलं. पण चौकशी आणि शवविश्छेदनानंतर त्यांची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली. गेल्या वर्षी ज्या अभिनेत्रीचं हृदयद्रावक निधन झालं त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून सोनाली फोगट आहेत. सोनाली हत्या प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती. पण सोनाली फोगट हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुधीर सागवान याला गोव्यातील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
गेल्या वर्षी सोनाली फोगट त्यांच्या दोन सहकाऱ्यांसोबत पार्टी करत होत्या. त्यानंतर सोनाली अंजुना गावात मृतावस्थेत आढळून आल्या. अशात सोनाली फोगट प्रकरणातील मुख्य आरोपी सुधीर सागवान आणि सुखविंदर सिंग यांच्यावर अभिनेत्रीला अंमली पदार्थ खायला दिल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवाय मृत्यूनंतर अनेक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले होते.
अशात सोनाली फोगट हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुधीर सागवान याला जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सागवान याच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘न्यायालयाने सागवान याला राज्य न सोडण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय दर शुक्रवारी सीबीआयसमोर हजर राहण्यास सांगितलं आहे.’ या प्रकरणी गोवा पोलिसांनी सागवान आणि त्याचा साथीदार सुखविंदर सिंग यांना गेल्या वर्षी अटक केली होती.
सोनाली फोगट यांच्यासोबत नक्की काय झालं..
सोनाली फोगट गेल्या वर्षी गोव्यात सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेल्या होत्या. पण २२ – २३ ऑगस्ट २०२२ च्या मध्यरात्री ड्रग्जच्या ‘ओव्हरडोज’मुळे त्यांचा मृत्यू झाला. सोनाली फोगट हत्या प्रकरणी गेल्या वर्षी सीबीआयने एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं होतं. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या प्रकरणाचा तपास या केंद्रीय संस्थेकडे सोपवण्यात आला होता. आता या प्रकरणी पुढे काय होतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सोनाली फोगट यांच्या पतीची देखील हत्या…
सोनाली फोगट यांचं लग्न संजय फोगट यांच्याशी झालं होतं. संजय आणि सोनाली फोगट यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव यशोधरा असं आहे. पण सोनाली यांच्या खासगी आयुष्यात अनेक चढ – उतार आले. सोनाली यांच्या पतीची देखील हत्या करण्यात आली.
2016 मध्ये पती संजय यांचा फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ज्यामुळे तुफान खळबळ माजली होती. पतीच्या निधनानंतर सोनाली यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.