कंगना ड्रग्जशी संबंधित नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार, सरकारकडून सुरक्षा का नाही? : राम कदम
महाविकास आघाडी सरकार कुणाला लपवण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत आहे?" असा सवाल राम कदम यांनी विचारला.
मुंबई : “बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ड्रग्जशी संबंधित माफिया नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार असताना ठाकरे सरकार तिला सुरक्षा का पुरवत नाही?” असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. (BJP MLA Ram Kadam asks Maharashtra Government why Actress Kangana Ranaut doesnt get any protection if willing to expose Bollywood-Drug mafia nexus)
“अभिनेत्री कंगना राणावत ड्रग्जशी संबंधित माफिया नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार असल्याचे स्वतः सांगत आहे. याचे स्वागत करत महाराष्ट्र सरकारने चार दिवसानंतरही कंगनाला सुरक्षा का दिली नाही? रियाचे वकील किंवा दलाल असल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार कुणाला लपवण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत आहे?” असा सवाल राम कदम यांनी विचारला.
राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. “सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीला एका फोन कॉलवर मुंबई पोलिसांकडून सुरक्षा उपलब्ध झाली. दुसरीकडे कंगनाने सुरक्षा पुरवल्यास बॉलिवूड आणि मुंबईतील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र तिला साधे उत्तरही न दिल्याने दुहेरी मापदंडामुळे संशय उत्पन्न होत आहे” असा घणाघात राम कदमांनी केला.
महाराष्ट्रसरकार ला कोणाल वाचवायचे आहें ? @KanganaTeam ला सुरक्षा का दिली नाही ? @AnilDeshmukhNCP @OfficeofUT @CPMumbaiPolice #SushantTruthNow #SushantSinghRajputCase pic.twitter.com/jKNNun9ZyV
— Ram Kadam (@ramkadam) August 30, 2020
“मी नार्कोटिक्स ब्युरोला मदत करण्यास उत्सुक आहे पण मला केंद्र सरकारकडून संरक्षण हवे आहे. मी फक्त माझे करिअरच नव्हे तर माझा जीवही धोक्यात घातला आहे, हे स्पष्ट आहे की सुशांतला काही गलिच्छ रहस्ये माहित होती, म्हणूनच तो मारला गेला.” असे ट्वीट कंगनाने चार दिवसांपूर्वी केले होते. (Ram Kadam on Kangana Ranaut)
I am more than willing to help @narcoticsbureau but I need protection from the centre government, I have not only risked my career but also my life, it is quiet evident Sushanth knew some dirty secrets that’s why he has been killed.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 26, 2020
संबंधित बातम्या :
सुशांत प्रकरणातील आरोपी संदीप सिंहने कोणत्या भाजप नेत्याला 53 कॉल केले? : सचिन सावंत
(BJP MLA Ram Kadam asks Maharashtra Government why Actress Kangana Ranaut doesnt get any protection if willing to expose Bollywood-Drug mafia nexus)