कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर हातोडा, आता खारमधील फ्लॅटवर कारवाईसाठी महापालिकेची पावले

कोर्टानं स्टे उठवल्यास ऑफिसपाठोपाठ कंगनाच्या राहत्या फ्लॅटमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामावरही पालिका कारवाई करु शकते.

कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर हातोडा, आता खारमधील फ्लॅटवर कारवाईसाठी महापालिकेची पावले
Follow us
| Updated on: Sep 09, 2020 | 12:48 PM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या पाली हिल भागातील कार्यालयावर हातोडा मारल्यानंतर आता मुंबई महापालिकेचे पुढील लक्ष्य कंगनाचे खारमधील राहते घर आहे. न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी बीएमसीने हालचाली सुरु केल्या आहेत. (BMC requests court to lift stay on action against Kangana Ranaut Khar Flat)

मुंबईतील खार रोड पश्चिम भागात 16 व्या रोडवर डिब्रीझ (DeBreez) अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर कंगनाचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये एफएसआयचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने 2018 मध्ये कंगनाला एमआरटीपी नोटीस दिली होती.

मुंबई महापालिकेच्या एमआरटीपी नोटीस विरोधात तिने दिंडोशी कोर्टात दाद मागितली होती. त्यावेळी कोर्टाने कंगनाची बाजू ऐकून घेत पुढील कारवाईस स्टे दिला होता, तर पालिकेला यावर सविस्तर बाजू मांडण्यास सांगितले होते.

गेल्या दोन वर्षात पालिकेने काहीच म्हणणे कोर्टात मांडले नव्हते, परंतु आता कंगनाला घेरण्यासाठी दोन दिवसांपूर्वी कोर्टात पालिकेने आपलं म्हणणं मांडलं आहे. तसंच या प्रकरणी दिलेली स्थगिती मागे घेण्याची विनंती कोर्टाला केली आहे

कोर्टानं स्टे उठवल्यास ऑफिसपाठोपाठ कंगनाच्या राहत्या फ्लॅटमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामावरही पालिका कारवाई करु शकते.

मुंबईतील कार्यालयावर महापालिकेचा हातोडा

कंगना रनौत हिच्या मुंबईतील कार्यालयावर महापालिकेचा हातोडा पडला. पालिकेने सकाळी 11 वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर कंगनाने आधी आपल्या ऑफिसला राम मंदिराची उपमा देत बीएमसीची तुलना बाबराशी केली, नंतर तिने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला.

कंगनाने दिलेली उत्तरे आणि कारणे समाधानकारक नाहीत, असे सांगत मुंबई महापालिकेने तिचे वांद्र्याच्या पाली हिल परिसरात असलेले कार्यालय पाडणार असल्याचे स्पष्ट केले होते. पालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी (9 सप्टेंबर) सकाळी 11 वाजताच्या सुमारास टाळे तोडून तिच्या कार्यालयात प्रवेश केला. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली.

“मणिकर्णिका फिल्म्सच्या कार्यालयात पहिला चित्रपट ‘अयोध्या’ जाहीर झाला. माझ्यासाठी ही इमारत नाही, तर एक राम मंदिर आहे, आज बाबर तिथे आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल. पुन्हा राम मंदिर पाडले जाईल, पण बाबर, हे लक्षात ठेव, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम” असे ट्वीट कंगनाने केले.

नंतर कंगनाने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला. आधीच पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने कंगना अडचणीत आली असताना आता एक पाऊल पुढे जात तिने थेट ‘पाकिस्तान’ म्हटल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या :

बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना

याकूब मेमनच्या घरावर कारवाई नाही, पण कंगनावर कारवाई, ठाकरे सरकार अहंकारी : आशिष शेलार

कंगनाची चौफेर कोंडी, विधानसभेत हक्कभंग, ड्रग्ज प्रकरणातही चौकशी होणार

(BMC requests court to lift stay on action against Kangana Ranaut Khar Flat)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.