Abhishek Bachchan | ‘हा’ प्रकार बघताच महिलेने काढला अभिषेक बच्चन याच्या कानाखाली जाळ, खळबळजनक खुलासा

बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. अभिषेक बच्चन याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. विशेष म्हणजे अभिषेक बच्चन देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो.

Abhishek Bachchan | 'हा' प्रकार बघताच महिलेने काढला अभिषेक बच्चन याच्या कानाखाली जाळ, खळबळजनक खुलासा
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 5:21 PM

मुंबई : बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचा लेक बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने 2002 मध्ये बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटात डेब्यू केला. अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याने सर्वांनाच अभिषेक बच्चन याच्याकडून मोठा अपेक्षा होत्या. विशेष म्हणजे सुरूवातीला अभिषेक बच्चन याला बऱ्याच चित्रपटाच्या (Movie) आॅफर आल्या. मात्र, अभिषेक बच्चन याच्यासाठी पुढचा रस्ता अत्यंत कठीण होता. अनेकदा लोकांनी त्याला थेट अभिनय न करण्याचा देखील सल्ला दिला. बऱ्याच लोकांना वाटले की, अमिताभ बच्चन यांचे नाव खराब अभिषेक बच्चन हा करतोय. अनेकांनी तर म्हटले होते की, अभिषेक बच्चन याला अजिबातच अभिनय जमत नाही.

अभिषेक बच्चन याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. युवा, कभी अलविदा ना कहना, मनमर्जिया असे हिट चित्रपट अभिषेक बच्चन याने बाॅलिवूडला दिले आहेत. विशेष म्हणजे अभिषेक बच्चन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मोठा चाहता वर्ग अभिषेक बच्चन याचा आहे.

अभिषेक बच्चन याने एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा केलाय. शरारत चित्रपट रिलीज झाल्यानंतर अभिषेक बच्चन याच्यासोबत एक अत्यंत मोठी घटना घडली होती. अभिषेक बच्चन याने सांगितले की, चित्रपट बघितल्यानंतर एक महिला उठली आणि तिने चक्क अभिषेक बच्चन यांच्या कानाखाली जाळ काढला.

गेयटी गॅलेक्सी थिएटरच्या बाहेरची ही घटना असल्याचे देखील अभिषेक बच्चन याने सांगितले. अभिषेक बच्चन हा पुढे म्हणाला की, त्या महिलेला माझा अभिनय अजिबातच आवडला नाही. यामुळे तिने माझ्या कानाखाली लावून दिली. त्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ती महिला म्हणत होती की, तू अभिनय करून नकोस. तुझ्या वडिलांचे नाव तू खराब करत आहेस.

पुढे अभिषेक बच्चन म्हणाला की, 10 वर्षांनंतर माझा बोल बच्चन हा चित्रपट रिलीज झाला. मग मी त्याच थिएटरमध्ये परत गेलो. मला चांगलेच आठवते की ते 10 हजार लोक बाहेर जमले होते आणि मी माझ्या कारमधून बाहेर पडलो. मग मी याचा एक फोटो काढून माझ्या वडिलांना पाठवला. आयुष्यामध्ये कधी कोणते चित्र बदलेल हे सांगता येत नसल्याचे देखील अभिषेक बच्चन याने म्हटले.

अभिषेक बच्चन याची बहीण आणि अमिताभ बच्चन यांनी लाडकी मुलगी श्वेता बच्चन नंदा हिचा मुलगा अगस्त्य नंदा हा लवकरच बाॅलिवूड चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार आहे. अगस्त्य नंदा, खुशी कपूर आणि सुहाना खान हे एकाच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये धमाका करताना दिसणार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.