अमिताभ बच्चन चक्क ‘या’ अभिनेत्रीची चप्पल हातात घेऊन फिरले, मोठा खुलासा, अभिनेत्रीने थेट कानाखाली देत…
बॉलिवूडच्या बिग बींनी मोठा धमाका चित्रपटांमध्ये केला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांचे खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलेले आहे. एक अत्यंत मोठा खुलासा हा करण्यात आलाय.
बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात. विशेष म्हणजे कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन दिसतात. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांचे काैतुक करतानाही मागे पुढे बघत नाहीत. चाहत्यांचे आवडलेले व्हिडीओ वगैरे ते कायमच शेअर करतात. अमिताभ बच्चन हे काैन बनेंगा करोडपतीच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांनी अनेक हीट चित्रपट दिली आहेत.
काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी मोठा खुलासा केला. आज अमिताभ बच्चन हे मोठे स्टार आहेत आणि त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. मात्र, एकवेळ अशी होती की, अमिताभ बच्चन यांनी चक्क त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीची चप्पल घेऊन फिरले होते. विशेष म्हणजे ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून वहिदा रहमान आहेत.
अमिताभ बच्चन यांनी म्हटले की, मला एकदा वहिदा रहमानसोबत काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट रेश्मा और शेरा होता. पुढे अमिताभ बच्चन हे म्हणाले की, एक सीन शूट करायचा होता, त्यामध्ये सुनील दत्त आणि वहिदा रहमान यांना चक्क वाळवंटात बसायचे होते. तिथे तापमान इतके जास्त होते की, तिथे बूटमध्ये उभे राहणे देखील कठीण होते.
त्यावेळी मला वहिदा जी यांची इतकी जास्त काळजी वाटली की, दिग्दर्शकाने ब्रेकची घोषणा करताच मी अजिबातच वेळ वाया न घालता थेट वहिदा रहमान यांची चप्पल घेऊन त्यांच्याकडे धावत गेलो. खरोखरच तो क्षण माझ्यासाठी किती जास्त खास होता हे मी सांगूच शकत नाही, आजही मला ती गोष्ट आठवते.
वहिदा रहमान या कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठा खुलासा केला. वहिदा रहमान यांनी म्हटले की, एका चित्रपटाच्या शूटसाठी मला अमिताभ बच्चन यांच्या कानाखाली मारायची होती. मात्र, मी सीनची तयारी करत असताना गंंमतीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या कानाखाली मारली होती. मात्र, खूप जोरात आवाज आला होता आणि त्यांना जास्त लागले देखील होते.