Chandrayaan 3 मिशनबद्दल अमिताभ बच्चन यांचं लक्षवेधी वक्तव्य, म्हणाले, ‘चांदोमामाच्या घरी…’
Amitabh Bachchan 'आपल्या लहानपणीचा चंदोमामा, तर प्रेयसीच्या चेहऱ्यावरील चंद्र...', Chandrayaan 3 मिशनबद्दल अमिताभ बच्चन यांचं लक्षवेधी वक्तव्य तुफान चर्चेत
मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : भारताचं चांद्रयान-3 आज चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे भारत आंतराळातील महाशक्ती म्हणून उदयाला येणार आहे. त्यामुळे भारताच्या या महत्त्वकांशी मिशन मूनकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. भारताचं चांद्रयान-3 अंतिम टप्प्यात असल्यामुळे मिशन पूर्ण व्हावं म्हणून प्रत्येक भारतीय प्रार्थना करत आहे. समान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाचं लक्ष चांद्रयान-3 कडे आहे. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत..
अमिताभ बच्चन म्हणाले, ‘संध्याकाळी जेव्हा चंद्र निघेल तेव्हा चंद्राच्या मातीत आपल्या देशाच्या पाऊलांचे ठसे असतील. आमचे चांद्रयान – 3 आमच्या मामाच्या घरी परत येईल, म्हणजे. चंदोमामाच्या घरी पोहोचेल. उद्या आमच्या बालपणीच्या कथांचा चंद्र, प्रेयसीच्या चेहऱ्यावरील चंद्र… उपवास आणि सणांचा चंद्र आपल्या देशाच्या आवाक्यात असेल. हे यश या देशातील प्रत्येक नागरिकाचं आहे… आता आपल्यालाही काहीतरी करावं लागणार आहे…’ असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी इस्रो टीमचे अभिनंदन केलं असून शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
#WATCH | On Chandrayaan 3 landing, actor Kareena Kapoor Khan says, “It’s a great moment for India and a proud moment for every Indian. All of us are waiting to watch it. I’m going to do that with my boys.” pic.twitter.com/MLJKJjoPsS
— ANI (@ANI) August 21, 2023
फक्त अमिताभ बच्चन यांनी नाही तर, अन्य बॉलिवूड सेलिब्रिटींनी इस्रो टीमचे अभिनंदन केलं असून शुभेच्छा देखील दिल्या आहेत. करीना कपूर, आर माधवन, मनोज जोशी, ऋषभ शेट्टी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत..
अभिनेता मनोज जोशी म्हणाला, ‘यामध्ये कोणती शंकाच नाही की, चांद्रयान-3 दक्षिण ध्रुवावर यशस्वी रित्या लॅडिंग करेल. कारण भारताच्या प्रत्येक नागरिकाप्रमाणे माझा देखील भारताच्या वैज्ञानिकांवर पू्र्ण विश्वास आहे. ज्यांचा या मिशनमध्ये मोलाचा वाटा आहे…’ सध्या सर्वत्र चांद्रयान-3 ची चर्चा सुरु आहे. हे क्षण प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानास्पद आहे..
सांगायचं झालं तर, चांद्रयान 3 पूर्वी, चांद्रयान-1 आणि 2 चंद्रावर पाठवण्यात आले होते. पहिला चांद्रयान २००८ मध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यानंतर 6 सप्टेंबर 2019 रोजी चांद्रयान-2 लॉन्च करण्यात आला जो अपयशी ठरल आहे. आता प्रत्येक भारतीय नागरिकाचं लक्ष चांद्रयान-3 कडे आहे. हा भारतासाठी एक एतिहासिक क्षण असणार आहे.