Virat Kohli | विराट कोहली ‘या’ चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये करणार आयटम साँग? बॉलिवूड अभिनेत्याचं ट्विट

विराट सध्या आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळत आहे. लीगच्या 16 व्या सिझनमध्ये कोहलीना आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये अर्धशतकं झळकावली आहेत.

Virat Kohli | विराट कोहली 'या' चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये करणार आयटम साँग? बॉलिवूड अभिनेत्याचं ट्विट
Virat KohliImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 3:20 PM

मुंबई : क्रिकेटर विराट कोहलीची दमदार बॅटिंग पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मात्र त्याचसोबत जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर किंवा एखाद्या कार्यक्रमात विराट थिरकताना दिसला, की त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होऊ लागतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या 21 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये विराट मैदानावर व्यायाम करत करत नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका बॉलिवूड अभिनेत्याने त्याला चक्क चित्रपटात आयटम साँगची ऑफर दिली आहे.

विराटला आयटम साँगची ऑफर देणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान आहे. विराटच्या डान्सचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत त्याने लिहिलं, ‘विराट कोहलीच्या नृत्य कौशल्याने मी खूप प्रभावित झालो आहे. म्हणूनच मी त्याला माझ्या ‘देशद्रोही 2′ या चित्रपटा आयटम साँगची ऑफर देतोय.’ केआरकेच्या या ट्विटरवर चाहते विराटच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत.

हे सुद्धा वाचा

कमाल राशिद खान हा अनेकदा त्याच्या ट्विट्समुळे चर्चेत असतो. बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल वादगस्त ट्विट करत तो प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करतो. मात्र यामुळे अनेकदा त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. नुकतीच त्याने अल्लू अर्जुनच्या आगामी ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या पोस्टरची खिल्ली उडवली होती. ट्विटरवर या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं होतं, ‘मी संभ्रमात आहे. हा लक्ष्मी 2 चा पोस्टर आहे की कंचना 2 चा? मला तरी हा पुष्पाच्या सीक्वेलसारखा अजिबात वाटत नाहीये.’ त्याआधी त्याने ‘तू झूठी में मक्कार’ या चित्रपटातील श्रद्धा कपूरच्या बिकिनी लूकची खिल्ली उडवली होती.

पहा व्हिडीओ

“चित्रपटात श्रद्धाला सारखं बिकिनी लूकमध्ये दाखवलं गेलंय. लव रंजन साहेब, तुम्ही हे तरी सांगा की तुम्हाला नेमकं काय दाखवायचं आहे? ती ना दीपिका पदुकोण आहे, ना कतरिना कैफ आणि ना करीना कपूर.. मग तुम्हाला नेमकं दाखवायचं आहे तरी काय? जर त्या बिचाऱ्या मुलीकडे काहीच नाही, तर तुम्ही तिला सतत बिकिनी लूकमध्ये दाखवून काय सिद्ध करू इच्छिता?”, असा सवाल त्याने दिग्दर्शकाला केला होता. मात्र या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी केआरकेला चांगलंच ट्रोल केलं होतं.

विराट सध्या आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळत आहे. लीगच्या 16 व्या सिझनमध्ये कोहलीना आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये अर्धशतकं झळकावली आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.