Atique Ahmed | ‘… तर ९८ टक्के राजकारण्यांचा अंत असाच होईल!..’, अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर अभिनेत्याचं वक्तव्य

पोलिसांसमोर अतिक आणि अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या; याप्रकरणी बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची प्रतिक्रिया, दोघांच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ...

Atique Ahmed | '... तर ९८ टक्के राजकारण्यांचा अंत असाच होईल!..', अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर अभिनेत्याचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 2:48 PM

मुंबई : आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर येताच सर्वत्र खळबळ माजली आहे. पोलिसांसमोर अतिक आणि अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रयागराज याठिकाणी मेडिकल कॉलेजसमोर तीन हल्लेखोरांनी माजी खासदार अतीक अहमद आणि माजी आमदार अशरफ अहमद यांची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना जेव्हा घडली तेव्हा पत्रकाद देखील घटनास्थळी उपस्थित होते. अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अतिक अहमद आणि अशरफ यांच्या निधनानंतर अनेक प्रसिद्ध व्यक्ती प्रतिक्रिया देत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार; शनिवारी रात्री १० वाजता पोलिसांचं पथक अतिक अहमद आणि अशरफ यांना प्रयागराजमधील कोल्विन रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. दरम्यान, पत्रकार म्हणून पोचलेल्या तीन हल्लेखोरांनी दोघांवर गोळीबार केला. या हल्ल्यात अतिक आणि अशरफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी अहमद आणि अशरफ यांचं शवविच्छेदन होणार आहे. पोलीस सध्या याप्रकरणी चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर चर्चा रंगत आहेत. हा फक्त पाप, पुण्याचा खेळ असं नेटकरी म्हणत आहेत. याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता कमाल राशिद खान ट्विट करत त्याचं मत व्यक्त करत आहे. देशात आमदार, खासदार सुरक्षित नसतील तर सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्नच उपस्थित राहत नाही… असं केआरके ट्विट करत म्हणाला.

केआरकेचं ट्विट करत म्हणाला, ‘अतिक अहमद जो पाच वेळा आमदार, एकदा खासदार राहिला आहे. तर त्याचा भाऊ अशरफ एक वेळा आमदार राहिला आहे. या लोकांची पोलिसांसमोर गोळी झाडून हत्या करण्यात आली. देशात जर आमदार, खासदार सुरक्षित नसतील तर, सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्नच उपस्थित राहत नाही…याच प्रकारे जर प्रत्येक गुन्हेगाराचा न्यायालयाबाहेर निर्णय होणार असेल तर ९८ टक्के राजकारण्यांचा अंत असाच होईल!’ सध्या केआरकेचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन हल्लेखोर प्रयागराज येथील राहणारे नसून, बाहेरील आहेत. पोलिसांना घटनास्थळावरुन तीन बंदुका, काडतुसं, कॅमेरा आणि ओळखपत्रे सापडली आहेत. घटनास्थळावरुन मिळालेल्या वस्तूंची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. तिघांकडे असलेला कॅमेरा कुठून आणला याचा शोध पोलीस घेत आहेत. शिवाय फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पुरावे गोळा करत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.