‘तो BJP जॉईन करतोय’, रितेश देशमुखचा मंत्रालयाच्या बाहेरील फोटो पाहून मुंबईकर आवाक
सध्या सोशल मीडियावर रितेश देशमुखचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी तो भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. आता या फोटोमागचे सत्य काय?

बॉलिवूडमधील मराठमोळा अभिनेता म्हणून रितेश देशमुख ओळखला जातो. त्याने अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. रितेश हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. रितेशचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सध्या सोशल मीडियावर रितेश एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटोपाहून नेटकऱ्यांनी रितेश राजकारणात प्रवेश करणार असे म्हटले आहे.
इन्स्टंट बॉलिवूड या सेलिब्रिटी इन्स्टाग्राम पेजवर रितेश देशमुखचे फोटो शेअर करण्यात आले आहे. या फोटोंमध्ये रितेश देशमुखचे कटआऊट मंत्रालयासमोर लावण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामध्ये त्याने पांढरा शर्ट, जॅकेट आणि पँट परिधान केली आहे. तसेच रितेशने दिलेली पोज पाहून प्रेक्षक बुचकळ्यात पडले आहेत. रितेशचे हे कटआऊट वांद्रे, माहिम, प्रभादेवी अशा अनेक ठिकाणी लावण्यात आले आहे. आता रितेशच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशनचा हा एक भाग आहे की आणखी काही भानगड आहे हे समोर आलेले नाही. मात्र, प्रेक्षकांनामध्ये उत्सुकता पाहायला मिळते.




वाचा: ‘मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे’, अभिनेत्रीचे खळबळजनक विधान
View this post on Instagram
काय आहे फोटो?
रितेशचे हे कटआऊट शेअर करत, ‘मुंबईतील काही प्रसिद्ध ठिकाणी रितेश देशमुखचे कटआऊट दिसले. वांद्रे येथील कला नगर जवळ, माहिम, शिवाजी पार्क, प्रभादेवी आणि मंत्रालयाजवळ हे कटआऊट लावण्यात आले आहेत. रितेश नव्या काही गोष्टींची हिंट देत आहे का?’ या आशयाचे कॅप्शन देण्यात आले आहे.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट
सोशल मीडियावर रितेशच्या या फोटोंची जोरदार चर्चा सुरु आहे. एका यूजरने कमेंट करत, ‘तो माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘आगामी नेता’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘महाराष्ट्राचा नवा काँग्रेस प्रेसिडेंट?’ असा सवाल केला आहे. चौथ्या एका यूजरने, ‘तो भाजपमध्ये प्रवेश करतोय’ असे म्हटले आहे.