भाजपामध्ये प्रवेश केलेले शेखर सुमन तब्बल इतक्या संपत्तीचे मालक, आलिशान बंगला ते या गाड्या..
Shekhar Suman : अभिनेते शेखर सुमन यांनी नुकताच राजकारण प्रवेश केला आहे. शेखर सुमन यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होती की, शेखर सुमन हे लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत. शेवटी त्यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलाय.
बाॅलिवूड अभिनेते शेखर सुमन हे कायमच चर्चेत असतात. शेखर सुमन गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूडमध्ये धमाका करताना दिसत आहेत. शेखर सुमनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोशल मीडियावर शेखर सुमन सक्रिय देखील दिसतात. विशेष म्हणजे शेखर सुमन हे कोट्यवधी संपत्तीचे मालक देखील आहेत. आता नुकताच शेखर सुमन यांनी राजकारणात प्रवेश केलाय. शेखर सुमन यांनी बीजेपीमध्ये प्रवेश केलाय. पंधरा वर्षानंतर परत त्यांनी राजकारणात प्रवेश केलाय. यापूर्वी 2009 मध्ये कांग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती.
त्यावेळी शेखर सुमन यांनी पटना साहिबमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. शेखर सुमन यांनी भाजपा उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणूकीमध्ये शेखर सुमन यांचा पराभव झाला. त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा हे विजयी ठरले होते. आता बीजेपीमध्येच शेखर सुमन यांनी प्रवेश केलाय.
शेखर सुमन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. विशेष म्हणजे शेखर सुमन हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक देखील आहेत. शेखर सुमन यांचे मुंबईमध्ये अत्यंत आलिशान असे घर आहे. हेच नाही तर शेखर सुमन हे लग्झरी गाड्यांचे मोठे शाैकीन आहेत. त्यांच्याकडे अत्यंत महागड्या गाड्या देखील आहेत.
रिपोर्टनुसार शेखर सुमन यांच्याकडे तब्बल 20 कोटी संपत्ती आहे. मुंबईमध्ये एक अत्यंत आलिशान असा बंगला देखील त्यांच्याकडे आहे. मर्सिडीज बेंज आणि बीएमडब्ल्यू सारख्या गाड्या देखील शेखर सुमन यांच्याकडे आहेत. विशेष म्हणजे शेखर सुमन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये टीव्ही मालिकांपासून बाॅलिवूड चित्रपटांपर्यंत काम केले आहे.
शेखर सुमन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये तब्बल 30 बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता शेखर सुमन हे राजकारणात काय धमाका करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगताना दिसत होत्या की, शेखर सुमन हे राजकारणात प्रवेश करणार आहेत. शेवटी त्यांनी बीजेपीमध्ये प्रवेश केला आहे.