मुंबईमध्येच नाही तर, परदेशातही ‘या’ अभिनेत्रीकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, संपत्तीचा आकडा थक्क करणारा

महागड्या गाड्या, कोट्यवधींची संपत्ती... फक्त अभिनय नाही तर, व्यवसाय देखील करते 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री... तिच्याकडे असणाऱ्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा...

मुंबईमध्येच नाही तर, परदेशातही 'या' अभिनेत्रीकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, संपत्तीचा आकडा थक्क करणारा
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 10:55 AM

मुंबई : मुंबईमध्ये स्वतःचं एक घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक जण मेहनत देखील घेत असतो. पण मायानगरीत सर्वांचे स्वप्न पूर्ण होतील असं नाही. पण बॉलिवूडमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी जिद्दीवर झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान भक्कम केलं. काही अभिनेत्री फक्त अभिनयच नाही, तर स्वतःचा व्यवसाय करुन देखील कोट्यवधींची माया कमावतात. बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री ज्यांची फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील कोट्यवधींची प्रॉपर्टी आहे. अशात अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan).

जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिची ओळख आहे. एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त ऐश्वर्याच्या नावाची चर्चा असायची. पण गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यावर सक्रिय नसताना देखील ऐश्वर्या चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या जेवढी मोठी आहे, तेवढाच मोठा आकडा अभिनेत्रीच्या संपत्तीचा आहे.

aishwarya rai

ऐश्वर्या फक्त एक प्रसिद्ध अभिनेत्री नसून प्रसिद्ध उद्योजिका देखील आहे. अभिनेत्रीची एकून संपत्ती कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री फक्त सिनेमांमधून नाही तर, इतर मार्गांनी देखील कोट्यवधींची माया कमावते. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर झगमगत्या विश्वात एक नवी ओळख तयार केली आहे.

ऐश्वर्या रायच्या सिनेमांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री एका सिनेमासाठी 10-12 कोटी रुपये मानधन घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या राय बच्चनची एकूण संपत्ती 775 कोटी रुपये आहे. अभिनेत्रीच्या नेट वर्थमागे ब्रँड एंडोर्समेंटचाही मोठा वाटा आहे.

ऐश्वर्या राय लोरियल, लक्स, नक्षत्र डायमंड ज्वेलरी, टायटन, लोढा ग्रुप, कल्याण ज्वेलर्स यांसारख्या मोठ्या ब्रँडची जाहिरात करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या फक्त ब्रँड एंडोर्समेंटमधून वर्षाला 80-90 कोटी कमावते. याशिवाय ऐश्वर्या रायने रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.

अभिनेत्रीचे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 21 कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे. त्याचवेळी अभिषेक आणि ऐश्वर्याने दुबईतही प्रॉपर्टी घेतली आहे. शिवाय ऐश्वर्याच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. ऐश्वर्या कुटुंबासोबत एक रॉयल आयुष्य जगते. अभिनेत्रीची प्रत्येक वस्तू प्रचंड महागडी असते.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी २००७ साली लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न मुंबईमध्ये ठरावीक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालं. लग्नानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. ज्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक अनेक वर्ष चर्चेत राहिले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.