ऐश्वर्या राय हिचे नो मेकअप लूकमधील ‘ते’ फोटो व्हायरल, अभिषेक बच्चनही…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीये.
ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिने गेली कित्येक वर्षे बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाका केलाय. ऐश्वर्या राय ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसतंय की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू असून लवकरच दोघे विभक्त होणार आहेत. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले गेले. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये.
दुसरीकडे नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न झाले. या लग्नात ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली होती. बच्चन कुटुंबियांसोबत ती लग्नात सहभागी झाली नाही. काही दिवसांपूर्वीच आराध्या हिच्या शाळेत फंक्शन होते, त्यावेळीही अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे वेगवेगळ्या गाड्यांमध्ये पोहोचले होते. त्यामध्येच अंबानींच्या फंक्शनमधील फोटो व्हायरल झाले.
ऐश्वर्या राय हिचे नो मेकअप लूकमधील काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये ऐश्वर्या राय हिने अजिबातच मेकअप केलेला दिसत नाहीये. जबरदस्त लूकमध्ये ऐश्वर्या राय ही दिसत आहे. ऐश्वर्या राय हिने केसांची वेनी घातल्याचे देखील दिसत आहे. जबरदस्त लूकमध्ये ऐश्वर्या पोहोचलीये.
या फोटोमध्ये ऐश्वर्या राय हिच्यासोबत पती अभिषेक बच्चन हा देखील दिसत आहेत. मात्र, हे फोटो काही दिवसांपूर्वींचे आहेत. सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे एकत्र स्पॉट होत नाहीत. अनंत अंबानी याच्या लग्नानंतर ऐश्वर्या राय ही आपल्या मुलीसोबत विदेशात गेली. मुंबई विमानतळावर ऐश्वर्या राय ही स्पॉट देखील झाली.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केल्यानंतर लग्न केले. 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी लग्न केले. विशेष म्हणजे यांच्या लग्नाचे काही फोटोही त्यावेळी व्हायरल होताना दिसले. अभिषेक बच्चन याच्यसोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय हिने सलमान खान याला डेट केले होते.