Alia Bhatt Corona | अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण, सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन

तिने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. (Bollywood Actress Alia Bhatt tested Corona positive)

Alia Bhatt Corona | अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण, सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन
Alia Bhatt
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 7:30 AM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी, क्रिकेटपटू, राजकीय क्षेत्रातील मंडळींना कोरोनाची लागण होत आहे. त्यात आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचा समावेश होणार आहेच. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. (Bollywood Actress Alia Bhatt tested Corona positive)

आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, मला कोरोनाची लागण झाली आहे. हॅलो, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर मी स्वत:ला विलग करुन घेतलं असून सध्या मी होम क्वारंटाईन आहे. कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल्स आणि डॉक्टरांच्या सूचनेचे मी पालन करत आहे. तुमच्या प्रेम आणि आधाराबद्दल धन्यवाद, सर्वांनी काळजी घ्या, असे आलिया भट्टने यात म्हटलं आहे.

आलिया आगामी चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त

दरम्यान, आलिया भट्ट सध्या तिच्या तीन आगामी चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यात दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ चित्रपट, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या दोन चित्रपटामुळे ती चांगलीच चर्चेत आहे. या शिवाय ती रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्र या चित्रपटातही दिसणार आहे.

अनेक बॉलिवूड स्टार कोरोनाबाधित

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. आमिर खान, कार्तिक आर्यन, परेश रावल यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाबाधित झाले आहेत. तर आर माधवनने मजेशीर पद्धतीने कोरोनाबाधित असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याशिवाय रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन वरुण धवन, नीतू सिंह यांसह अनेकांना यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं. (Bollywood Actress Alia Bhatt tested Corona positive)

संबंधित बातम्या : 

RRR | आलिया भट्टच्या वाट्यालाही ‘सीते’ची भूमिका, मार्चमध्ये चाहत्यांना मिळणार मोठे सरप्राईज!

Alia Bhatt | ‘पॅशनेट अबाऊट वर्क’, कोरोना चाचणी निगेटिव्ह येताच कामावर परतली आलिया भट्ट!

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.