‘या प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या को-स्टारसोबत करायच्या फ्लर्ट…’ कोणी केला मोठा खुलासा?

झगमगत्या विश्वामागील अनेक गोष्टी समोर.... प्रसिद्ध अभिनेत्री कोणासोबत करायच्या सर्वात जास्त फ्लर्ट.. तर रॉयल पर्टी देणाऱ्या अभिनेत्याचं नाव देखील आलं समोर...

'या प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या को-स्टारसोबत करायच्या फ्लर्ट...' कोणी केला मोठा खुलासा?
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 11:41 AM

मुंबई : झगमगत्या विश्वाचं आकर्षण प्रत्येकाला असतं. झगमगत्या विश्वातील ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी प्रत्येकाला आवडत असते… पण या झगमगत्या विश्वामागील अनेक गोष्टी गुपीत असतात.. पण कधीतरी काही गोष्टी चाहत्यांसमोर येतात.. शिवाय आपल्या आवडत्या अभिनेता – अभिनेत्रीच्या आयुष्यात काय सुरु आहे.. अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.. सेलिब्रिटी मुलाखतींमध्ये अनेक खासगी गोष्टींचा खुलासा करतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री बिंदू (Bindu) यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.. बिंदू यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.. अनेक सिनेमांमध्ये विरोधी भूमिका साकारत बिंदू यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं…

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत बिंदू यांनी अभिनेत्री झिनत अमान (Zinat Aman) आणि अभिनेते – फिल्ममेकर राज कपूर (Raj Kapoor) यांच्याबद्दल मोठा खुलासा केला.. सध्या सर्वत्र बिंदू आणि त्यांनी बॉलिवूडबद्दल सांगितलेल्या काही गोष्टींची तुफान चर्चा रंगत आहे… बिंदू यांनी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींमध्ये होत असलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या…

‘७० व्या दशकात कोणते असे सेलिब्रिटी होते, जे आपल्या को-स्टारसोबत फ्लर्ट करायचे..’ यावर बिंदू यांनी मोठा खुलासा केला. बिंदू म्हणाल्या, ‘झिनत अमान…’ झिनत यांचं नाव घेतल्यानंतर बिंदू यांनी त्यांची माफी देखील मागितली… शिवाय तेव्हा सर्वात जास्त स्टायलिश अभिनेत्री म्हणून शर्मिला टागोर यांची ओळख होती. त्यांना प्रत्येक गोष्ट अचूक लागत होती…

पुढे बिंदू यांनी बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त लॅविश पार्टी कोण देत.. यावर क्षणाचाही विलंब न करता बिंदू यांनी अभिनेते राज कपूर यांचं नाव घेतलं.. बिंदू म्हणाल्या, ‘राज कपूर यांची तुलना कोणीच करु शकत नाही.. राज कपूर त्यांच्या पार्ट्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या सारखी पार्टी कोणीच देवू शकत नव्हतं शिवाय कितीही प्रयत्न केले तरी राज कपूर यांच्या प्रमाणे पार्टी देणं कठीण होतं..’ असं देखील बिंदू म्हणाल्या…

शिवाय यावेळी बिंदू यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायकांची नावे देखील सांगितली. ‘प्रेम चोप्रा. अमजद खान आणि रंजीत.. यांना खलनायकाच्या रुपात पाहणं मला आवडतं….’ असं देखील बिंदू यावेळी म्हणाल्या… शिवाय बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत बिंदू यांची चांगली मैत्री देखील आहे…

बिंदू यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. बिंदू यांनी ‘बिवी हो तो ऐसी’, ‘हवस’, ‘कटी पतंग’, ‘दो रास्ते’, ‘प्यार झुकता नही’, ‘अभिमान’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे…

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.