‘मला हवं ते सगळं मिळालं नाही, कारण…’, धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणून हेमा मालिनी यांचा संघर्ष

'मला पश्चाताप होत आहे, पण...', दोन मुलींच्या जन्मानंतर कसं होतं हेमा मालिनी यांचं आयुष्य, धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणून अभिनेत्रीने केलाय अनेक गोष्टीचा सामना

'मला हवं ते सगळं मिळालं नाही, कारण...', धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणून हेमा मालिनी यांचा संघर्ष
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 9:57 AM

मुंबई : अभितेने धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमाचे किस्से आज देखील चाहत्यांमध्ये रंगतात. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाआधी दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. मोठ्या पडद्यावर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांना दुसऱ्या पत्नीचा दर्जा मिळाला. पण त्यांना कधीही आयुष्यात जे हवं ते मिळालं नाही. हेमा यांनी अनेकदा मुलाखतींच्या माध्यमातून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

२०१८ मध्ये झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी धर्मेंद्र आणि दोन मुलींबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मुलाखतीत अभिनेत्रीला विचारण्यात आलं की, ‘तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी आहात?’ यावर हेमा म्हणाल्या, ‘मी असं नाही म्हणणार की सर्व काही ठिक आहे. प्रत्येकाला आयुष्यात जे हवं आहे, ते मिळत नाही. व्यक्ती जेव्हा तरुण वयात असतो, तेव्ह परफेक्ट आयुष्याचे स्वप्न पाहत असतो. पण त्याचा काहीही अर्थ नसतो…’

हे सुद्धा वाचा

पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मला ते सगळं मिळालं नाही, जे मला हवं होतं. पण ज्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या, त्या गोष्टींच्या आठवणीत राहणं मी बंद केलं. माझ्याकडे दोन मुली होत्या. मी माझ्या आयुष्यातील तीस वर्ष माझ्या दोन मुलींसोबत जगले आहेत. त्यांना शाळेत सोडणं, त्याचा अभ्यास घेणं, केस करणं, त्यांचे हट्ट पुरवणं… दोघींमुळे मी पुन्हा बालपण जगले.’

‘आता दोघी मोठ्या झाल्या आहे. आता मी मागे वळून पाहते, तर मला असं वाटतं काही तरी मागे राहिलं आहे. ज्यांची मला आजही आठवण येते. आयुष्याच्या प्रत्येत टप्प्यावर मी धर्मेंद्र यांची आठवण काढली. जेव्हा लग्न झालं, तेव्हा मला वाटलं गोष्टी जुळून येतील. पण तसं काही झालं नाही. जी परिस्थिती आहे, ती मी स्वीकारली होती.’

हेमा मालिनी पुढे म्हणाल्या, ‘मला माझ्या मुली भेटल्या. त्यांचा सांभाळ करताना अनेक अडचणी आल्या. एक व्यक्ती म्हणून आजही पश्चाताप होत आहे, पण ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात. जेव्हा त्यांचा विचार करते, त्यांच्या भावनांचा विचार करते, तेव्हा सगळं काही ठिक वाटतं. त्यांची अनुपस्थिती देखील… ‘

समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं. प्रकाश कौर यांच्यासोबत घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नाच्या जवळपास ४० वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.