Bollywood | सासरे – पतीने सांगितल्यामुळे अभिनेत्रीने सुरु केलं ‘असं’ काम; प्रेग्नेंसीमध्ये तिच्यावर ओढावलं संकट

वयाच्या १५ व्या वर्षी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने वडिलांच्या इच्छेनुसार केलं लग्न; सासरे आणि पतीने सांगितल्यानंतर सुरु केलं 'असं' काम... अखेर प्रेग्नेंसीमध्ये कोसळला दुःखाचा डोंगर..

Bollywood | सासरे - पतीने सांगितल्यामुळे अभिनेत्रीने सुरु केलं 'असं' काम;  प्रेग्नेंसीमध्ये तिच्यावर ओढावलं संकट
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 9:51 AM

मुंबई | बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नानंतर वैवाहिक आयुष्य आणि करियरला सारखं महत्त्व दिलं. आजही काही अभिनेत्रींनी आई झाल्यानंतर देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला. पण काही अशा अभिनेत्री आहेत, ज्यांना लग्न आणि प्रेग्नेंसी काळात अनेक गोष्टींचा सामना करावा लागला, आता काही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नाहीत, पण बॉलिवूडमध्ये त्यांचं असलेलं योगदान विसरता येणारं नाही. आज फक्त सेलिब्रिटीच नाही तर सर्वसामान्य मुली देखील त्यांच्या इच्छेनुसार जोडीदार निवडतात आणि लग्न करतात. पण ८० च्या दशकातील गोष्ट फार वेगळी आहे. अभिनेत्री मोठ्या पडद्यावर तर आल्या, पण काही अभिनेत्रींनी लग्नानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं .

सध्या ज्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, तिने वयाच्या १५ व्या वर्षी वडिलांच्या इच्छेनुसार लग्न तर केलं. पण अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात मात्र अनेक चढ – उतार आले. अभिनेत्रीने वयाच्या १५ व्या वर्षी लग्न केल्यानंतर सासरे आणि पती यांनी सांगितल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण लग्नानंतर बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणं अभिनेत्रीसाठी फार कठीण होतं.

वडिलांच्या इच्छेनुसार लग्न, सासरे आणि पतीच्या यांनी सांगितल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव मौसमी चटर्जी (Moshumi Chatterjee) असं आहे. मौसमी चॅटर्जी यांनी १९६७ साली प्रदर्शित झालेल्या ‘बालिका वधू’ सिनेमाच्या माध्यमातून करियरची सुरुवात केली. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर मौसमी ‘रोटी, कपडा और मकान’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान प्रेग्नेंट राहिल्या.

‘रोटी, कपडा और मकान’ सिनेमात मौसमी यांना रेप सीन शुट करायचा होता. त्यांनी रेप सीन तर शूट केला पण, अभिनेत्री यांना ब्लिडिंग सुरु झाली. या घटनेमुळे सेटवर उपस्थित व्यक्तींना मोठा धक्का बसला होता. पण सुदैवाने मौसमी चॅटर्जी यांच्या बाळाला काही झालं नाही.

रिपोर्टनुसार; मौसमी चटर्जी यांना दोन मुलींना जन्म दिला होता. त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव पायल मुखर्जी होतं तर दुसऱ्या मुलीचं नाव मेघा मुखर्जी आहे. पायल घरातील मोठी मुलगी आसल्यामुळे मौसमी यांच्या फार जवळ होती. पण २०१९ मध्ये पायलचं निधन झाल्यानंतर मौसमी चटर्जी यांना मोठा धक्का बसला. मुलीच्या निधनानंतर त्यांच्यावर दुखाःचा डोंगर कोसळला.

मौसमी चटर्जी आज बॉलिवूड आणि झगमगत्या विश्वापासून दूर आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडवर फक्त आणि फक्त मौसमी चटर्जी यांचं राज्य होतं. मौसमी चटर्जी यांनी रोटी कपडा और मकान, अनुराग, प्यासा सावन, घर एक मंदिर यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.