ऐश्वर्या राय हिचे नाव ऐकताच चढला जया बच्चन यांचा पारा, थेट म्हणाल्या, काय ऐश्वर्या ऐश्वर्या….
बॉलिवूड अभिनेत्री आणि अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच नात नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये जया बच्चन या पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांनी काही मोठे खुलासे केले. अनंत अंबानी याच्या लग्नातही जया बच्चन या पोहोचल्या होत्या.
जया बच्चन यांनी मोठा काळ बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. जया बच्चन पापाराझी यांच्यावर भडकताना दिसतात. याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. विमानतळावर फोटो घेत असताना जया बच्चन या पापाराझी यांच्यावर रागावल्या होत्या. हेच नाहीतर आयकार्डची मागणीही त्यांनी पापाराझी यांच्याकडे केली होती. बऱ्याचवेळा जया बच्चन पापाराझी यांना फोटोसाठी पोझ देखील देत नाहीत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात जया बच्चन पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांचा मूड चांगला होता आणि त्या पापाराझी यांना फोटोसाठी पोझ देताना देखील दिसल्या.
जया बच्चन यांना ऐश्वर्या बच्चन हिच्यासोबत काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र, यावेळी ऐश्वर्याचे नाव ऐकून जया बच्चन यांचा पारा चांगलाच चढल्याचे बघायला मिळाले. जया बच्चन या डायरेक्टर सुभाष घई यांच्या पत्नीच्या बर्थडे पार्टीमध्ये एकदा पोहोचल्या होत्या. यावेळी पापाराझी यांनी सून ऐश्वर्या हिच्याबद्दल काही प्रश्न विचारले.
यावेळी एका पापाराझीने ऐश्वर्या राय हिचे नाव घेतले. यावेळी जया बच्चन या थेट म्हणाल्या की, काय ऐश्वर्या ऐश्वर्या करत आहे….ती काय तुझ्या वर्गात शिकली आहे का? यावेळी त्यांचा राग चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यानंतर जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना देखील दिसला.
अनंत अंबानीच्या लग्नात जया बच्चन या अमिताभ बच्चन, मुलगी श्वेता नंदा आणि नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत पोहोचल्या होत्या. दुसरीकडे ऐश्वर्या राय ही आपली मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली होती. गेल्या काही दिवसांपासून सतत सांगितले जातंय की, ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू आहे. मात्र, यावर जया बच्चन, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या किंवा अभिषेक बच्चन यांनी काहीच भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. यांचे लग्न त्यावेळी सर्वाधिक चर्चेत राहणारे लग्न होते. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.