करिश्मा कपूर दुसऱ्या लग्नासाठी सज्ज? वडिलांकडून मोठा खुलासा
'करिश्माला दुसरं लग्न करायचं असेल तर ती...', करिश्मा कपूरच्या दुसऱ्या लग्नावर वडिलांची प्रतिक्रिया, अभिनेत्री दुसऱ्या लग्नासाठी सज्ज? करिश्मा कपूर कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता करिश्मा अभिनय विश्वात पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. काही दिवसांपूर्वी करिश्मा हिने प्रश्न-उत्तरांचं सेशन सोशल मीडियावर ठेवलं होतं. तेव्हा अभिनेत्रीला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री स्वतःची स्पष्ट भूमिका मांडली.
सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने ‘दुसरं लग्न करणार का?’ असा प्रश्न करिश्मा हिला विचारला. यावर अभिनेत्री ‘डिपेंड्स’ म्हणजे निर्भर करतं… असं अभिनेत्री म्हणाली. सांगायचं झालं तर, पहिल्या नवऱ्या घटस्फोट दिल्यानंतर करिश्मा कपूर हिने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. अभिनेत्री दोन मुलांचा सांभाळ सिंगल मदर म्हणून करत आहे. अभिनेत्री मुलांसोबत फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.




करिश्मा कपूरच्या दुसऱ्या लग्नावर वडिलांचं वक्तव्य
करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी मुलीच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘जर करिश्माला दुसरं लग्न करायचं असेल तर ती करु शकते. दुसऱ्या लग्नामध्या वाईट असं काही नाही. पण करिश्माला दुसरं लग्न करायाचं नाही…’ असं देखील रणधीर कपूर म्हणाले होते.
करिश्मा कपूर हिचं पहिलं लग्न
करिश्मा कपूर हिचं पहिलं लग्न 2003 मध्ये दिल्लीतील उद्योजक संजय कपूर यांच्यासोबत झालं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा घटस्फोट झाला. आता करिश्मा 17 वर्षीय मुलगी आणि 12 वर्षीय मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
करिश्माला पती करायचा मारहाण
घटस्फोटानंतर करिश्मा कपूर हिने खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला. करिश्मा हिने सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले. पतीने देखील अभिनेत्रीला अनेकदा मारहाण केली. करिश्मा शारीरावरील जखमा मेकअपने लपवायची…
हनीमूनच्या दिवशी लावली करिश्माची बोली
एका मुलाखतीत करिश्मा हिने हनीमूनच्या दिवशी घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. संजय याने लग्नानंतर पहिल्या रात्री करिश्मा कपूर हिची बोली लावली होती. सांगायचं झालं तर, करिश्मा कपूर प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर चढली, पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीने अनेक चढ-उतारांचा सामना केला. पण आता करिश्मा मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.