‘डान्स दीवाने 3’च्या सेटवरील कोरोना विस्फोटानंतर माधुरी दीक्षित थेट व्हॅकेशनवर! मालदीवमध्ये करतेय धमाल

माधुरी दीक्षित आपल्या परिवारासोबत मालदीवमध्ये धमाल करतेय. तिने मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत.

'डान्स दीवाने 3'च्या सेटवरील कोरोना विस्फोटानंतर माधुरी दीक्षित थेट व्हॅकेशनवर! मालदीवमध्ये करतेय धमाल
अभिनेत्री माधुरी दीक्षित सुट्टीसाठी मालदीवमध्ये
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 10:23 PM

मुंबई : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने 3 मध्ये प्रशिक्षण करतेय. माधुरी सध्या कोरिओग्राफर धर्मेश येलांडे आणि तुषार कालियासोबत शो जज करतेय. डान्स दीवानेच्या सेटवरील 18 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर सेटवर मोठी सावधगिरी बाळगली जात आहे. अशावेळी माधुरी दीक्षित आपल्या परिवारासोबत मालदीवमध्ये धमाल करतेय. तिने मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत.(Bollywood actress Madhuri Dixit with family in Maldives)

बॉलिवूडमधील अनेक कलाकार सुट्टी घालवण्यासाठी सध्या मालदीवचा पर्याय निवडत आहेत. आता या यादीत माधुरी दीक्षितच्या नावाचाही समावेश झाला आहे. माधुरीने फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, हॅलो फ्रॉम पॅराडाईज. फोटोत अभिनेत्री डेनिम शॉर्ट्ससह प्रिंटेड शर्ट आणि टोपी घातली आहे. माधुरीचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीला उतरत आहे.

माधुरी दीक्षितने पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह मालदीवमध्ये एन्जॉय करतानाचा व्हिडीओही शेअर केला आहे. ‘प्रत्येक दिवस शानदार असतो फक्त तो तुमच्यावर अवलंबून आहे. कारण तुम्ही त्याच्याकडे कसे पाहता. मात्र हा आठवडा चांगला आहे’, असं हा व्हिडीओ शेअर करताना माधुरीने लिहिलं आहे.

‘डान्स दिवाने 3’ च्या सेटवर कोरोनाचा विस्फोट

अभिनेत्री माधुरी दीक्षित परीक्षकाची भूमिका पार पाडत असलेल्या ‘डान्स दिवाने’ या शोच्या सीझन 3मध्ये तब्बल 18 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कारणामुळे सध्या सेटवरील सर्व लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितसह डान्सर धर्मेश येलांडे आणि तुषार कालिया हा कार्यक्रम होस्ट करत आहेत.

एका प्रसिद्ध बेवसाईटच्या वृत्तानुसार, ‘डान्स दिवाने’ सीझन 3च्या सेटवरील 18 क्रू मेंबर्सचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. क्रू मेंबर कोरोना संक्रमित झाल्याची बातमी समोर आल्यानंतर, या कार्यक्रमाच्या गोरेगाव फिल्मसिटी स्थित सेटवर मोठा गोंधळ माजला आहे. या प्रकरणात, एफडब्ल्यूईसीएसचे (FWICE) सरचिटणीस अशोक दुबे यांनी एका अग्रगण्य दैनिकाशी बोलताना सांगितले की, ‘जे काही घडले ते दुर्दैवी होते. आमची प्रार्थना आहे की, ज्यांना संसर्ग झाला आहे ते लवकर बरे व्हावेत’.

कोणाकोणाला झाली लागण?

सध्या केवळ शोच्या क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. यात अद्याप कोणताही स्पर्धक किंवा परीक्षक यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेले नाही .

त्यांनी सांगितले की, ‘या शोची शूटिंग सुरु होण्याआधी त्यातील सहभागी कलाकार आणि सर्व क्रू मेम्बर्सची अगोदरच कोरोना चाचणी केली जाते, आणि म्हणूनच त्यांच्याकडे आता नवीन क्रू बोलवण्यासाठी थोडा वेळ आहे. या शोचे पुढील शूट 5 एप्रिल रोजी होणार असून, त्यावेळी पुन्हा एकदा सगळ्यांची प्री-टेस्ट होणार आहे. जे कोरोना-निगेटिव्ह असतील, केवळ त्यांनाच शूटिंगची परवानगी दिली जाईल. परंतु, यानंतरही सेटवर बरीच सावधगिरी बाळगली जाईल.

संबंधित बातम्या :

माधुरी दीक्षितच्या शोमध्ये कोरोनाचा विस्फोट, एकापाठोपाठ 18 जणांना संसर्ग, कुणाकुणाला लागण?

PHOTO | वामिकाच्या जन्मानंतर पुन्हा सेटवर परतली अनुष्का शर्मा, ‘कूल लूक’ पाहून चाहतेही उत्सुक!

Bollywood actress Madhuri Dixit with family in Maldives

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.