AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Ali Khan | ‘व्हिटामिन सीचा डेली डोस’, मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर बिकिनीत सारा अली खानचा जलवा!

अभिनेत्री सारा अली खान सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरून तिने हे हॉट बिकिनी फोटो शेअर केले आहेत.

Sara Ali Khan | ‘व्हिटामिन सीचा डेली डोस’, मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर बिकिनीत सारा अली खानचा जलवा!
अभिनेत्री सारा अली खान
| Updated on: Mar 04, 2021 | 3:03 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Actress Sara Ali khan) सध्या सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. सोशल मीडियावर ती दररोज काहीना काहीतरी शेअर करत राहते. आपल्या वेगवेगळ्या लूकने ती चाहत्यांची मने जिंकते. साराचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. नुकताच तिने ऑरेंज कलरच्या बिकिनीमधला एक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या खूप चर्चेत आहे (Actress Sara Ali khan Shares sizzling Bikini photos on social media).

अभिनेत्री सारा अली खान सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरून तिने हे हॉट बिकिनी फोटो शेअर केले आहेत. मालदीवमध्ये साराने बिकिनी फोटोशूट केले आहे. जे आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नुकताच साराने एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘व्हिटॅमिन सीचा डेली डोस’. ती मालदीवमधील समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटत आहे. साराचे हे फोटो 1.4 दशलक्षाहून अधिक लोकांनी लाईक केले आहेत.

सारा अली खानची इंस्टा पोस्टः

(Actress Sara Ali khan Shares sizzling Bikini photos on social media)

आईसमवेत अजमेर शरीफ दर्शन!

साराचे करिअर सध्या कासवाच्या गतीने सुरू आहे. दरम्यान, सारा अजमेरमधील ख्वाजा गरीब नवाजच्या दर्ग्यावर पोहोचली होती. यावेळी अभिनेत्री आणि साराची आई अमृता सिंह देखील तिच्या सोबत होती. दोघींनीही अजमेर शरीफ दर्शन घेतले. याचे फोटो आणि व्हिडीओ साराने सोशल मीडियावर शेअर केले होते.

सारा अली खानने अमृता आणि तिची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. बऱ्याचवेळा सारा अली खान आपल्या आईबरोबर मंदिरात, तर कधी कधी दर्ग्यामध्ये बघायला मिळते. सारा जेव्हा तिची आई अमृता सिंगसमवेत दर्ग्यावर पोहोचली, तेव्हा तिच्या भोवती कडक सुरक्षा व्यवस्था दिसली होती. तथापि, साराचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी येथे जमा झाले होते.

साराच्या हाती अ‍ॅक्शन फिल्म

पहिल्यांदाच सारा अ‍ॅक्शन फिल्ममध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘द अमर अश्वत्थामा’ या चित्रपटात ती स्टंट करताना दिसणार आहे. यासाठी ती घोडेस्वारीपासून मार्शल आर्टपर्यंत सगळ्याचे ट्रेनिंग ती घेत आहे. या चित्रपटात अभिनेता विक्की कौशल तिच्यासोबत झळकणार आहे (Actress Sara Ali khan Shares sizzling Bikini photos on social media).

मीडिया रिपोर्टनुसार विक्की कौशलने देखील या चित्रपटासाठी तयारी सुरु केली आहे. तो अनेक तास जिममध्ये व्यायाम करताना दिसतोय. पात्र जिवंत भासावे म्हणून तो तिरंदाजी, तलवार, भाला आणि मार्शल आर्ट्स शिकतोय. त्याचबरोबर सारा अली खान देखील या सिनेमात अनेक अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. यासाठी ती एप्रिल महिन्यापासून प्रशिक्षण सुरू करणार आहे.

ड्रग्जच्या प्रकरणात अडकल्यामुळे चिंताग्रस्त!

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स केस समोर आल्यावर सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोण, रकुल प्रीत यासारख्या बड्या अभिनेत्रींची चौकशी केली गेली. यात कोणावरीलही आरोप अद्याप सिद्ध झाले नाहीत. मात्र, साराने यातून बरेच काही सहन केले आहे. आता साराकडे फार मोजकेच प्रोजेक्ट आहेत आणि काम मिळवण्यासाठी ती अनेक वेळा निर्मात्यांच्या कार्यालयात फिरताना दिसत आहे. नुकतीच ती वरुण धवनसोबत ‘कुली नंबर 1’मध्ये दिसली होती. अ‍ॅमेझॉन प्राइमवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात तो अपयशी ठरला.

(Actress Sara Ali khan Shares sizzling Bikini photos on social media)

हेही वाचा :

Shraddha Kapoor | चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘कपूर’ घराण्यात लवकरच ऐकू येणार सनईचे सूर!

Sooryavanshi | अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ला मोठं ग्रहण! प्रेक्षकांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार?

कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.