बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नर्सची ड्युटी, बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये अभिनेत्री शिखा मल्होत्रा सहा महिन्यांपूर्वी नर्स म्हणून रुजू झाली होती.

बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नर्सची ड्युटी, बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 12:04 PM

मुंबई : कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी परिचारिका म्हणून रुजू झालेली बॉलिवूड अभिनेत्री शिखा मल्होत्रा (Shikha Malhotra) हिला कोरोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शिखाने आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली. गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णसेवा करत असलेली शिखा जोगेश्वरीमधील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. (Bollywood Actress Shikha Malhotra who serves Corona Patients tested COVID Positive)

‘कोव्हिड पॉझिटिव्ह असून रुग्णालयात दाखल झाले आहे. सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. कोरोना म्हणजे काहीच नाही, असं म्हणणाऱ्यांसाठी ही पोस्ट आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने रुग्णसेवा करत आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे रणमैदानात मी सुखरुप राहिले आणि तुमच्या प्रार्थनांमुळेच मी लवकरच यातून बाहेर पडेन, याची खात्री आहे. आतापर्यंत कोणतीही लस विकसित झालेली नाही, त्यामुळे स्वतःची आणि प्रियजनांची काळजी घ्या. मास्क घाला, नियमितपणे हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा. तुमच्या प्रेम आणि आदराबद्दल आभार’ असं लिहून शिखाने दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पहिल्या फोटोत ती रुग्णालयातील बेडवर झोपलेली दिसते, तर पीपीई किट घातला असतानाचा एक फोटोही तिने शेअर केला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये सहा महिन्यांपूर्वी ती रुजू झाली होती.

View this post on Instagram

*Tested Positive* #Admitted अभी oxygen की कमी महसूस हो रही है ? पोस्ट उनके लिए जो कहते हैं कोरोना कुछ नहीं ? #serving #continuously from past 6 months with all of your best wishes and prayers ??‍⚕️?? आप सभी की दुआएँ ने छ: महिने तक जंग के मैदान में सलामत रखा और मुझे पूरा भरोसा है की अब भी आप सब की दुआओं से ही मैं जल्द स्वस्थ हो जाऊँगी ? अभी तक कोई vaccine तैयार नहीं हुई है तो अपना व अपने प्रियजनों का ख़्याल रखें, मास्क पहनना, नियमित रूप से हाथ बार बार धोना, sanitiser का इस्तेमाल करना न भूले ?? असीम प्रेम व सम्मान के लिए आभार ??? जय हिंद ?? #coronafighternurse #shikhamalhotra #versatile #actress #coronawarriorsindia

A post shared by Shikha Malhotra (@shikhamalhotraofficial) on

अभिनेत्री शिखा मल्होत्राने फॅन, रनिंग शादी अशा काही बॉलिवूडपटांमध्ये भूमिका केली आहे. शिखाने संजय मिश्रा यांच्यासोबत ‘कांचली’ या समीक्षकांनी गौरवलेल्या राजस्थानी चित्रपटातही मुख्य भूमिका साकारली आहे.

शिखाने वर्धमान महावीर मेडीकल कॉलेज आणि दिल्लीमधील सफदरजंग हॉस्पिटलमधून 2014 मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेतले. अभिनय क्षेत्रात वळल्यामुळे तिने नर्सचे काम केले नव्हते. ‘नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर आम्ही समाजसेवेची शपथ घेतली होती. माझ्या मते हीच ती योग्य वेळ आहे’ असे म्हणत तिने रुग्णसेवेचे व्रत स्वीकारले.

बीएमसीने शिखाला नर्स म्हणून काम करण्यास परवानगी दिली. त्यानुसार मार्च महिन्यापासून ती जोगेश्वरी पूर्वमधील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये ड्युटी करत आहे. तिची नियुक्ती आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

बॉलिवूड अभिनेत्री ‘कोरोना’ग्रस्तांच्या सेवेत, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये ड्युटी

(Bollywood Actress Shikha Malhotra who serves Corona Patients tested COVID Positive)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.