Amitabh Bhachchan सोबतच्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडली अभिनेत्री; नंतर तिची झालेली अवस्था म्हणजे…
बिग बींसोबत साकारलेल्या 'त्या' सीननंतर अभिनेत्रीला झाला होता पश्चाताप; रात्री घरी पोहोचल्यानंतर आईच्या कुशीतल ढसाढसा रडली अभिनेत्री...
मुंबई : बॉलिवूडमधील काही अशा गोष्टी आहेत, ज्या अनेक वर्षानंतर सर्वांच्या समोर आला. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक अभिनेत्रींनी महत्त्वाची भूमिका बजावली. एक काळ असा होता, जेव्हा फक्त आणि फक्त बिग बींची चर्चा होती. आजही अमिताभ बच्चन यांची असलेली लोकप्रियता कमी झालेली नाही. बॉलिवूडमध्ये करियर घडवत असताना अमिताभ बच्चन यांनी अनेक गोष्टींचा सामना केला. ज्यामुळे बिग बी तुफान चर्चेत आले. महत्त्वाचं म्हणजे, एकेकाळी मोठ्या पडद्यावर फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांचा बोलबाला होता. म्हणून त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक अभिनेत्री उत्सुक होत्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे स्मिता पाटील.
अभिनेत्री स्मिता पाटील आज आपल्यात नसल्या तर, त्यांच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांसोबत आहे. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. डिलीव्हरी दरम्यान काही अडचणी आल्यामुळे स्मिता पाटील याचं निधन झालं. अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत लग्न केल्यानंतर स्मिता पाटील यांनी मुलगा प्रतीक बब्बर याला जन्म दिला. पण मातृत्वाचं सुख त्या अनुभवू शकल्या नाहीत.
स्मिता पाटील यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘नमक हलाल’ सिनेमात स्मिता आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमातील ‘आज रपट जाएं’ गाणं आजही चाहत्यांना लक्षात आहे. पण जेव्हा गाण्याचं शूट पूर्णझालं त्यानंतर रात्री स्मिता पाटील ढसाढसा रडल्या होत्या.. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे.
‘आज रपट जाएं’ गाण्यात स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांचे अनेक रोमांटिक सीन होते. पावसात भिजताना दोघांना रोमांटिक सीन द्यायचे होते. पण शुटिंगच्या वेळी स्मिता पाटील घाबरल्या होत्या. शूट संपल्यानंतर घरी पोहोचताच त्या आईच्या कुशीत ढसाढसा रडू लागल्या. बिग बींसोबत रोमांटिक सीन दिल्याचा त्यांना पश्चाताप होत होता.
स्मिता पाटील यांच्या मनातील भावना अमिताभ बच्चन यांना कळाल्यानंतर, त्यांनी अभिनेत्रीची समज काढली. गाण्याची स्क्रिप्ट आणि गरज असल्यामुळे सिन शूट करण्यात आले… असं बिग बी, स्मिता पाटील यांना म्हणाले.. त्यानंतर स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांची घट्ट मैत्री झाली. सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरला. स्मिता पाटील आज आपल्यात नसल्या तरी, त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांमध्ये आजही कायम आहेत.