Tamannaah Bhatia | तमन्ना भाटियाची कोरोनावर यशस्वी मात, घरी परतलेल्या अभिनेत्रीचे जोरदार स्वागत!
बॉलिवूडची ‘बाहुबली’ अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतली आहे.
मुंबई : बॉलिवूडची ‘बाहुबली’ अभिनेत्री तमन्ना भाटिया (Bollywood Actress Tamannaah Bhatia) कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतली आहे. एका वेब सीरीजच्या चित्रीकरणासाठी तमन्ना हैदराबादमध्ये गेली होती. त्यावेळी तिला कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर तिला हैद्राबादमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 5 ऑक्टोबरला तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर ती गृहविलागीकारणात होती. (Bollywood Actress Tamannaah Bhatia returned home after winning battle with Corona)
— Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) October 5, 2020
तमन्ना परत येताच, घरी तिचे जोरदार स्वागत झाले आहे. हे स्वागत तिच्या पालकांनी नाहीतर, एका खास पाहुण्याने केले आहे. घरी परतलेल्या तमन्नाचे स्वागत तिच्या लाडक्या कुत्र्याने केले आहे. तमन्नाने (Bollywood Actress Tamannaah Bhatia) हा खास व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तमन्ना आपल्या गाडीने घरी परतताना दिसली आहे. जिथे ती आपल्या कुटूंबाला भेटते. तमन्नाला घरात पाहताच तिच्या कुत्र्याला प्रचंड आनंद झाला आहे. तिला घरात शिरताना पाहताच, तो धावत तिच्या जवळ जातो. तमन्ना आणि तिच्या या पाळीव कुत्र्याची केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
View this post on Instagram
ऑगस्ट महिन्यात तमन्नाने (Tamannaah Bhatia) ट्विट करत आपल्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. ‘माझ्या कुटुंबियांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्याने, खबरदारी म्हणून आम्ही सर्वांनी कोरोना चाचणी केली. आणि या चाचणी दरम्यान माझ्या आई-वडिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत’, असे ट्विट तिने केले होते. त्यावेळी तमन्नासह तिच्या स्टाफ मेंबर्सची चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, त्यानंतर चित्रीकरणादरम्यान तमन्नालाही कोरोनाची लागण झाली होती. (Bollywood Actress Tamannaah Bhatia returned home after winning battle with Corona)
चित्रीकरणासाठी रवाना होण्यापूर्वी मुंबईत होती तमन्ना
वेब-सिरीजच्या चित्रीकरणासाठी हैद्राबादला रवाना होण्यापूर्वी तमन्ना (Tamannaah Bhatia) मुंबई होती. लॉकडाऊन दरम्यान ब्युटी ट्रीटमेंटसाठी एका सलूनमध्ये जात असताना, ती माध्यमांच्या कॅमेरात कैद झाली होती. जीन्स-टीशर्टमध्ये नो-मेकअप लूक फ्लाँट करणाऱ्या तमन्नाने मास्क परिधान केला होता.
या बॉलिवूड कलाकारांनाही झालेली कोरोनाची लागण
संपूर्ण जगभरात दहशत पसरवलेल्या कोरोना विषाणूने (Corona) बॉलिवूडकरांनाही हैराण केले. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, रेखा, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, आफताब शिवदासनी, किरण कुमार या कलाकारांनाही कोरोनाची लागण (Corona Positive) झाली होती. संगीतकार वाजिद खानचा कोरोनाने बळी घेतला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोन्ही बंधूंना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना संसर्गामुळे त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे.
(Bollywood Actress Tamannaah Bhatia returned home after winning battle with Corona)