कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल, बायको देखील कायद्याच्या कचाट्यात, गंभीर आहे प्रकरण?

Remo D'Souza: कोरिओग्राफर रेमो डिसोझासह पत्नी देखील कायद्याच्या कचाट्यात, दोघांसह अनेकांवर गुन्हा दाखल, अत्यंत गंभीर आहे प्रकरण...

कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल, बायको देखील कायद्याच्या कचाट्यात, गंभीर आहे प्रकरण?
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 9:09 AM

Remo D’Souza: झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कोरिओग्राफर रेमो डिसोझा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. फसवणूकी प्रकरणी रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसोझा याच्यासह त्याची पत्नी , फेम प्रोडक्शन कंपनी यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वसई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी व्हि अनबिटेबल डान्स ग्रुप यांची 11 कोटी 96 लाख 10 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

डान्स ग्रुपची फसवणूक केल्याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. पण त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने डान्सग्रुपने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिसांना तपास करून चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

दरम्यान, पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हे शाखा वसई युनिटचे पोलीस निरीक्षक यांनी तपास करून अहवाल सादर केला. त्यानंतर मीरारोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या रेमो डिसोझा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

रेमो डिसोझा याच्यासह त्याची पत्नी लिझेल डिझोझा, ओमप्रकाश चौव्हाण, रोहित जाधव, फेम प्रॉडक्शन कंपनी, रमेश गुप्ता यांच्यासह एका पोलीस कर्मचार्‍याच्या विरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात फसवणूक केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला. याप्रकरणी गुन्हे शाखा वसई शाखेचे वरिष्ठ पोलीस प्रमोद बडाख हे अधिक तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.