जेव्हा 10 वर्षांच्या लेकीसाठी कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून अभिनेत्याने घेतला शेवटचा श्वास

वयाच्या 66 व्या वर्षी अभिनेत्याचं निधन, 10 वर्षीय मुलीसाठी कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून अभिनेत्याचा अंत होता अत्यंत वाईट... अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडचं मोठं नुकसान तर झालंच पण चाहत्यांना देखील फार मोठा धक्का बसला...

जेव्हा 10 वर्षांच्या लेकीसाठी कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून अभिनेत्याने घेतला शेवटचा श्वास
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 2:21 PM

मुंबई | 20 डिसेंबर 2023 : यंदाच्या वर्षी अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला. ज्यामुळे बॉलिवूडचं मोठं नुकसान तर झालंच, पण चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. एवढंच नाही तर, घरातील मुख्य व्यक्तीचं निधन झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. असंच काही कौशिक कुटुंबासोबत देखील झालं. जेव्हा आपल्या अभिनयाने सर्वांना पोट धरुन हसवणारे अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक मात्र चाहत्यांना रडवून दुसऱ्या विश्वात गेले… सतीश कौशिक यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती. 2023 मध्ये आनंदात रंगपंचमी साजरी केल्यानंतर सतीश कौशिक यांना हृदयविकाराचा झटका आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं…

सतीश कौशिक यांचं निधन 9 मार्च 2023 मध्ये झालं. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. सतीश कौशिक पत्नी आणि 10 वर्षांच्या मुलीला सोडून गेले. सतीश कौशिक यांच्या पत्नीचं नाव शशी कौशिक आणि मुलीचं नाव वंशिका कौशिक असं आहे. मुलगी 10 वर्षांची असताना सतीश कौशिक यांनी अखेरचा श्वास घेतला. पण कुटुंबासाठी सतीश यांनी कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवली आहे.

सतीश कौशिक यांनी सिनेविश्वात तीन दशक मोलाचं योगदान दिलं. अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत सर्वच क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. रिपोर्टनुसार, 2023 मध्ये सतीश कौशिक यांची एकूण संपत्ती ४० कोटी रुपये इकती आहे. इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्ष काम करत सतीश कौशिक यांनी मोठी रक्कम जमा केली.

हे सुद्धा वाचा

सतीश कौशिक यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांनी ‘मौसम’ सिनेमातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरु केलं. सतीश कौशिक यांनी 100 सिनेमांमध्ये काम केलं. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अभिनेते अनुपम खेर अनेकदा त्यांच्या मुलीसोबत दिसले. एवढंच नाही तर, सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका आणि अनुपम खेर यांच्यामध्ये खास नातं आहे.

सतीश कौशिक याचे सिनेमे

निधनानंतर सतीश कौशिक यांचा एक सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री कंगना रनौत स्टारर ‘इमरजेन्सी’ सिनेमातून सतीश कौशिक यांची शेवटची झलक चाहत्यांना पाहाता येणार आहे. सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा सुरुवातील नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमा 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सिनेमात कंगना रनौत आणि सतीश कौशिक यांच्यासोबत, श्रेयस तळपदे, अनुपम खेर आणि अभिनेत्री महिमा चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे. चाहते देखील ‘इमरजेन्सी’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.