वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळाली, रस्त्यावर झोपली, शारीरिक छळ, ‘ही’ महिला आज आहे 4 राष्ट्रीय पुरस्कारांची विजेती

women life : वयाच्या 15 व्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोडलं वडिलांचं घर... अनेक रात्र रस्त्यावर काढल्या, आज 'ही' महिला अविवाहित पण कोट्यवधी रुपयांचा मालकीण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त महिलेच्या संघर्षाची चर्चा...

वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळाली, रस्त्यावर झोपली, शारीरिक छळ, 'ही' महिला आज आहे 4 राष्ट्रीय पुरस्कारांची विजेती
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 3:07 PM

मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : मायानगरी मुंबईत अनेक कलाकार स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. पण कुटुंबाशिवाय आणि आर्थिक पाठबळ नसेल तर, मुंबईत राहणं फार कठीण आहे. पण मुंबईत येऊन स्वतःची ओळख निर्माण करण्याची स्वप्न अनेक जण पाहतात. पण यशाच्या शिखरावर मात्र फार कमी जण पोहोचू शकतात. इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी वडिलांचं घर सोडलं. बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे. जिने वयाच्या 15 व्या वर्षी घर सोडलं आणि मुंबईत आली.

अभिनेत्री मुंबईत आली तेव्हा तिच्याकडे काहीही नव्हतं. स्वतःचं घर नसल्यामुळे अभिनेत्री रस्त्यावर झोपली. अभिनेत्रीला शारीरिक छळाचा सामना करावा लागला. अनेकांनी अभिनेत्रीची फसवणूक केली. पण तिच्या मदतीला कधीच कोणी आलं नाही. अनेक कठीण प्रसंगाचा सामना केल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.

सध्या ज्या अभिनेत्री चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री कंगना रनौत आहे. खुद्द कंगना हिने तिच्या वाईट दिवसांबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘माझा प्रवास फार कठीण होता. मुंबईत आली तेव्हा मी रॉयल आयुष्य जगत नव्हती. मी बस, टॅक्सी, ट्रेनमधून प्रवास केला आहे. पायी चालली आहे. माझ्याकडे घर नव्हतं म्हणून मी रस्त्यावर झोपली आहे….’

हे सुद्धा वाचा

‘अनेकांच्या जाळ्यात मी अडकली होती, म्हणून पोलिसांत तक्रार दाखल करावी लागली. वयाच्या 17 व्या वर्षी वडिलांच्या वयाच्या व्यक्तीने माझं शोषण केलं. व्यक्ती बॉलिवूडमधील होता. मी त्याच्या जाळ्यात अडकली आहे मला कळलं होतं. तुम्हाला वाटतं लोकं तुमच्या मदतीसाठी येत असतात. पण फुकट जेवायला कोणी देत नाही.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘वडिलांच्या वयाच्या व्यक्तीने माझ्या डोक्यावर वार केला. मी रक्त बंबाळ अवस्थेत होती. त्या व्यक्ती विरोधात मी तक्रार दाखल केली. पण काहीही झालं नाही. त्याला समज दिली आणि त्याची सुटका झाली…’ कंगना हिने अनेक संकटांचा सामना करत यश मिळवलं आहे. कुटुंबातील कोणीही इंडस्ट्रीतील नसलं तरी, देखील अभिनेत्रीने स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं.

आज कंगना हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने एक दोन नाही चार राष्ट्रीय पुरस्कारांवर स्वतःचं नाव कोरलं आहे. कंगना आज गडगंज संपत्तीची मालकीण आहे. कंगना एका सिनेमासाठी 15 ते 27 कोटी रुपये मानधन घेते. सोशल मीडियावर देखील कंगना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.