राम मंदिर उद्घाटनादिवशी बॉलिवूड इंडस्ट्री इतिहासात पहिल्यांदाच राहणार बंद

राम मंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असून आता अवघे काही तास बाकी आहेत. अशातच मोठी बातमी समोर आली आहे. संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री 22 जानेवारीला बंद राहणार आहे.

राम मंदिर उद्घाटनादिवशी बॉलिवूड इंडस्ट्री इतिहासात पहिल्यांदाच राहणार बंद
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 9:33 PM

मुंबई : अयोध्येमध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. या सोहळ्याआधी संपूर्ण देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये. देशातील प्रत्येक रामभक्त या क्षणाची वाट पाहत आहे. अशातच माहिती समजत आहे की, 22 जानेवारीला संपूर्ण बॉलिवूड बंद राहणार आहे. या दिवशी कोणत्याही चित्रपटाचे शुटींग होणार नसल्याचं समजत आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने सुट्टी जाहीर केली आहे. एफडब्ल्यूआयसीईचे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी निवेदनात, विशेष प्रसंगी सुट्टी जाहीर करत असून कोणत्याही चित्रपटाचं शुटींग होणार नाही.  कारण सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

फक्त या चित्रपटांचं शुटींग राहणार सुरू

जर एखाद्या चित्रपटाचं शुटींग न केल्यास मोठं नुकसान होत असेल किंवा काही एमेरजन्सी असेल तर परवानगी मिळणार आहे. त्यासाठी जे काही योग्य कारण असेल ते नमूद करून विनंती पत्र पाठवावं लागणार आहे. त्यानंतर परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन परवानगी दिली जाणार असल्याचं बीएन तिवारी यांनी म्हटलं आहे.

रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठान सोहळा देशभरातील रामभक्तांना यावा म्हणून सत्तरपेक्षा जास्त शहरातील 160 हून अधिक सिनेमागृहांमध्ये लाईव्ह पाहता दाखवलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला 100 रूपये देऊन सिनेमागृहांमध्ये एन्ट्री मिळणार आहे.

दरम्यान, बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अजय देवगण, सनी देओल, हेमा मालिनी, रणबीर कपूर, आलिया भट,मधुर भांडारकर आणि जय लीला भन्साळी यांना आमंत्रित केलं आहे. साऊथमधील मेगास्टार चिरंजीवी, रजनीकांत, ऋषभ शेट्टी, यश, प्रभास आणि मोहनलाल यांनाही बोलावण्यात आलं आहे.

'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.