कृष्णा अभिषेक याचा ‘तो’ मोठा खुलासा, मामा गोविंदाबद्दल म्हणाला, आता…

अभिनेता गोंविदा याच्या पायाला काही दिवसांपूर्वीच चुकून गोळी लागल्याची घटना घडली. त्यानंतर गोविंदावर शस्त्रक्रिया करण्यात आला. आता नुकताच गोविंदाचा भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक याने मोठा खुलासा केलाय. कृष्णा अभिषेक हा गोविंदाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला होता.

कृष्णा अभिषेक याचा 'तो' मोठा खुलासा, मामा गोविंदाबद्दल म्हणाला, आता...
Krishna Abhishek
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 4:12 PM

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्या पायाला काही दिवसांपूर्वीच गोळी लागली. बंदूक साफ करत असताना गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची हैराण करणारी घटना काही दिवसांपूर्वीच पहाटे घडली. ज्यावेळी गोविंदाच्या पायाला गोळी लागली, त्यावेळी त्याची पत्नी घरात नव्हती. गोविंदाच्या मुलीने त्याला लगेचच रूग्णालयात नेले. आता काही आठवडे गोविंदाला आराम करण्यास डॉक्टरांनी सांगितले. गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आलीये. गोविंदाला गोळी लागल्यानंतर सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले. रूग्णालयातून घरी जाताना गोविंदा मीडियासमोर येऊन बोलताना दिसला.

गोविंदाचा भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक हा मामा गोविंदाला गोळी लागल्यानंतर खूप जास्त चिंतेत दिसला. ज्यावेळी गोविंदाला गोळी लागली त्यावेळी तो कामानिमित्त ऑस्टेलियाला होता. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने चिंता व्यक्त केली होती. हेच नाही तर आपले काम अर्ध्यामध्ये सोडूनही त्याची येण्याची तयारी होती.

कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह ही गोविंदाला पाहण्यासाठी लगेचच रूग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर मामाच्या तब्येतीचे अपडेट तिनेच कृष्णा अभिषेकला दिले. आता ऑस्टेलियावरून परतल्यानंतर सर्वात अगोदर कृष्णा अभिषेक हा गोविंदाच्या घरी पोहोचला. याबद्दलची माहिती स्वत: कृष्णा अभिषेक याने दिलीये.

नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये कृष्णा अभिषेक याने म्हटले की, मी ऑस्टेलियावरून आल्यावर सर्वात अगोदर मामा गोविंदाच्या घरी गेलो. विशेष म्हणजे मी तब्बल सात वर्षांनी त्यांच्या घरी गेलो. साधारणपणे मी चीची मामा (गोविंदा) सोबत एक तास होतो. आम्ही बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. आमच्यामध्ये इतक्या दिवसांपासून असलेल्या जुन्या वादावर अजिबात भाष्य केले नाही.

टीनाला मी जवळपास सात वर्षांनी भेटलो आम्ही भावूक झालो. प्रत्येक कुटुंबामध्ये काहीतरी गोष्टी घडतात आणि त्यानंतर जेंव्हा परत सर्वजण एकत्र येतात त्यालाच कुटुंब म्हणतात. तिथे देखील कोणीही जुन्या वादाबद्दल अजिबात बोलले नाही. मामीसोबत भेट झाली नाही कारण ती बिझी होती. आता तर काय नेहमीच मामाकडे जाईल मामीसोबत कायमच भेट होत राहिल. सात वर्षांचा वणवास संपल्याचे देखील कृष्णाने म्हटले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.