अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचे निधन, कॅनडामध्ये अखेरचा श्वास

अब्दुल कदुस यांना मूत्रपिंडाचा त्रास होता. गेल्या पंधरा वर्षांपासून ते आजाराशी झुंजत होते. (Kader Khan Son Quddus Khan dies)

अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचे निधन, कॅनडामध्ये अखेरचा श्वास
कादर खान यांचे पुत्र अब्दुल कदुस यांचे निधन
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 8:57 AM

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेते कादर खान (Kader Khan) यांच्या मोठ्या मुलाचे निधन झाले. अब्दुल कदुस (Quddus Khan) यांनी कॅनडामध्ये अखेरचा श्वास घेतला. कादर खान यांचे अडीच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. आपल्या मुलांजवळ राहण्यासाठी कादर खान मृत्यूपूर्वी कॅनडाला शिफ्ट झाले होते. (Bollywood Late Actor Kader Khan Son Quddus Khan dies in Canada)

पंधरा वर्षांपासून आजाराशी झुंज

अब्दुल कदुस यांना मूत्रपिंडाचा त्रास होता. गेल्या पंधरा वर्षांपासून ते आजाराशी झुंजत होते. गेल्या वर्षांपासून त्यांना सातत्याने डायलिसीस करावे लागत असे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले होते. 24 मार्चनंतर त्यांना बोलायलाही त्रास होत होता, अशी माहिती त्यांची भावजय शाहिस्ता यांनी दिली.

कॅनडामध्ये अंत्यसंस्कार

24 मार्चला अब्दुल कदुस कोमामध्ये गेले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. 31 मार्चला अखेर त्यांच्या निधनाचं वृत्त आलं. त्यांच्या पार्थिवावर कॅनडामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. कादर खान हे मृत्यूसमयी ज्येष्ठ पुत्र सरफराज यांच्यासह राहत होते, तर धाकटे पुत्र अब्दुल हे त्यांच्या घरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर होते.

अब्दुल कदुस हे कॅनडा विमानतळावर सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. कादर खान यांना तीन मुलं. त्यांचे द्वितीय पुत्र सरफराज यांनी बॉलिवूड सिनेमांची निर्मिती केली आहे.

कादर खान यांचेही कॅनडामध्ये निधन

दमदार संवाद लेखण आणि अभिनयामुळे प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर छाप सोडलेले अभिनेते कादर खान यांनी 31 डिसेंबर 2018 रोजी अखेरचा श्वास घेतला. कादर खान यांनी कॅनडा देशाचं नागरिकत्व स्वीकारलं होतं. कॅनडामध्येच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. (Kader Khan Son Quddus Khan dies)

विनोदाचा सम्राट

कादर खान खान यांनी हिंदी सिनेसृष्टीत सुमारे 43 वर्षे काम केले. जवळपास 300 हून अधिक सिनेमांमधून अभिनय आणि 250 हून अधिक सिनेमांचं संवाद लेखन केले होते. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात अफगाणिस्तानात झाला, भारत ही त्यांची कर्मभूमी होती, तर कॅनडात त्यांची प्राणज्योत मालवली.

संघर्षातून तयार झालेला अभिनेता अशी कादर खान यांची ओळख आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून ते पुढे आले आणि संघर्ष करत त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह प्रेक्षकांवरही शोककळा पसरली होती.

संबंधित बातम्या :

कॉमेडीचा बादशाह कादर खान काळाच्या पडद्याआड

(Bollywood Late Actor Kader Khan Son Quddus Khan dies in Canada)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.