Aamir Khan आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक; कुबेरापेक्षा कमी नाही अभिनेत्याचा खजाना

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे अभिनेता आमिर खान जगतो रॉयल आयुष्य; कुबेरापेक्षा कमी नाही अभिनेत्याचा खजाना, संपत्तीचा आकडा ऐकून व्हायल थक्क

Aamir Khan आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक; कुबेरापेक्षा कमी नाही अभिनेत्याचा खजाना
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 11:49 AM

मुंबई : ‘लाल सिंग चड्ढा’, ‘दंगल’, ‘पीके’, ‘गजनी’, ‘तारे जमीन पर’, ‘लगान’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत अभिनेता आमिर खान याने चाहत्यांच्या मनात आणि कलाविश्वात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं. आमिर खान असा अभिनेता आहे, जो एकावेळी फक्त एक सिनेमावर लक्ष केंद्रीत करतो आणि सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांपर्यंत मजल मारतो. अभिनेता आज स्वतःचा ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची संपत्ती किती कोटी आहे हे जाणून घेवू. रॉयल आयुष्य जगणाऱ्या आमिर खान याच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा आहे.

आमिर खान बॉलिवूडचा असा अभिनेता आहे, ज्याचा सिनेमा १०० कोटी क्लबमध्ये पोहोचला होता. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या अभिनेत्याच्या ‘गजनी’ सिनेमाने १०० कोटी रुपयांचा गल्ला पार केला. ‘गजनी’ सिनेमाचा रेकॉर्ड देखील आमिर खानच्या सिनेमानेच मोडला. ‘गजनी’ सिनेमानंतर ‘थ्री इडियट्स’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली.

गेल्या ३० वर्षांपेक्षा जास्त काळ अभिनेता बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आमिरचे अनेक सिनेमे हिट ठरले, पण त्याच्या अनेक सिनेमांना अपयशाचा देखील सामना करावा लागला. ‘ लाल सिंह चड्ढा’ सिनेमाला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. शिवाय लाल सिंह चड्ढा सिनेमाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला. ( Aamir Khan Net Worth)

हे सुद्धा वाचा

आमिर खान सिनेमांशिवाय टीव्ही शो, जाहिराती आणि प्रॉडक्शनच्या माध्यमातून देखील कोट्यवधींची कमाई करतो. रिपोर्टनुसार आमिर खान एका जाहिरातीसाठी तब्बल १० ते १२ कोटी रुपये मानधन घेतो. तर सिनेमासाठी अभिनेता जवळपास ५० कोटी रुपये मानधन स्वीकारतो. शिवाय सिनेमाला होणाऱ्या नफ्यात देखील अभिनेत्याचा आर्धा वाटा असतो.

आमिर खान याच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार अभिनेता दिवसाला जवळपास ३३ लाख रुपयांची कमाई करतो. तर आमिर याची नेटवर्थ जवळपास १८०० कोटी रुपये आहे. आमिर स्वतःच्या मेहनतीने जेवढे पैसे कमतो, तेवढाच अभिनेता टॅक्स देखील भरतो. आमिर खान अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जे सर्वात जास्त टॅक्स भरतात.

आमिर खान याच्याकडे कार कलेक्शन देखील तगडं आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्याकडे जवळपास १० गाड्या आहेत. ज्यामध्ये मर्सिडीज बेन्ज, रॉल्स रॉयस आणि फोर्ड यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे. आमिर खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.