बॉलिवूड स्टार भरतात लाखो रुपये भाडं, का घेत नाहीत स्वतःचं घर? जाणून घ्या कारण

अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम उभा राहतो तो म्हणजे, बॉलिवूड स्टार यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असते, तरी देखील स्वतःच्या घरात न राहता का भरतात महिन्याला लाखो रुपये भाडं

बॉलिवूड स्टार भरतात लाखो रुपये भाडं, का घेत नाहीत स्वतःचं घर? जाणून घ्या कारण
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 4:02 PM

मुंबई : स्वप्नांच्या शहरात म्हणजे मुंबईमध्ये स्वतःचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि मुंबईत घर घेण्यासाठी प्रत्येक जण कष्ट आणि मेहनत करत असतो. अशात सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न कायम उभा राहतो, तो म्हणजे मुंबईमध्ये सेलिब्रिटी रॉयल आयु्ष्य जगतात पण अभिनेता सलमान खान, ऋतिक रोशन, कार्तिक आर्यन, कृती सेनन आणि अनुपम खेर यांसारखे प्रसिद्ध सेलिब्रटी देखील स्वतःच्या घरात न राहता भाड्याच्या घरात राहतात. सेलिब्रिटी भाड्याच्या घरात राहून महिन्याला लाखो रुपये भाडं भरतात. महिन्याला लाखो रुपये भाडं भरण्यापेक्षा सेलिब्रिटी स्वतःच्या घरात का नाही राहत असा प्रश्न देखील अनेकांना पडतो.

सेलिब्रिटी भाड्याने राहतात यामागे देखील मोठं कारण आहे. सेलिब्रिटी महिन्याला लाखो रुपये भाडं भरतात, त्यामध्ये सेलिब्रिटी आरामात वन बीएचके घर घेवूच शकतात. सेलिब्रिटी भाड्याने राहतात म्हणजे त्यांची स्वतःची प्रॉपर्टी नाही असं तुम्हाला वाटत असले, पण असं नाही. सलमान खान, ऋतिक रोशन, अनुपम खेर यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांकडे त्यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे.

सलमान खान, ऋतिक रोशन, अनुपम खेर हे कलाकार स्वतःचं घर असून देखील महिन्याला जवळपास ५ ते ८ लाख रुपये भाडं भरतात. सेलिब्रिटी भाड्याच्या घरात राहतात कारण, सेलिब्रिटी शुटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. म्हणून भाड्याच्या घरात राहण्यासाठी सेलिब्रिटींची पसंती असते. ज्यामुळे त्यांना सेटवर जाण्यासाठी उशीर होत नाही.

हे सुद्धा वाचा

स्वतःचं घर खरेदी करण्याशिवाय सेलिब्रिटी वेग-वेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवतात. ज्यामुळे त्यांना फायदा होतो. जर तेच पैसे सेलिब्रिटी घर खरेदी करण्यात लावतील, तर पुढच्या १० ते २० वर्षांमध्ये त्यांना हवा तसा नफा मिळणार देखील नाही. सेलिब्रिटी मुंबईमध्ये स्वतःचं घर घेतात पण त्या घरात त्यांचं कुटुंब राहतं. एवढंच नाही तर, भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे त्यांना टॅक्स पासून देखील सवलत मिळते.

सोशल मीडियावर कायम सेलिब्रिटींच्या घरांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सेलिब्रिटी त्यांच्या घराची सजावट महाड्या वस्तूंनी करत असतात. मुंबईत अनेक नवीन कलाकार आले आणि स्वतःची स्वप्न पूर्ण केली. काहीचं मुंबईमध्ये भव्य घर आहेत, तर काही सेलिब्रिटी भाड्याने राहतात. त्यांचं महिन्याचं भाडं लाखोंमध्ये असतं. आपल्याला हवं तसं आयु्ष्य जगता यावं म्हणून देखील सेलिब्रिटी भाड्याच्या घरात राहतात.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.