Vishal Anand | ‘चलते चलते’ फेम अभिनेता विशाल आनंद काळाच्या पडद्याआड
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विशाल आनंद यांचे दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. (Bollywood actor Vishal Anand passed away)
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विशाल आनंद (Vishal Anand) यांचे दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. ‘चलते चलते’ या प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केले होते. अभिनयाशिवाय त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. व्यवसाय विश्लेषक गिरीश जौहर (Girish Johar) यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. (Bollywood actor Vishal Anand passed away)
“आणखी एक दुख:द बातमी… विशाल आनंद काळाच्या पडद्याआड, ‘चलते चलते’, दिल से मिले दिल’ ही गाणी सदैव लक्षात राहतील,” असे ट्विट गिरीश जोहर यांनी केले.
विशाल आनंद गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे रविवारी 4 ऑक्टोबरला निधन झाले. प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांचे ते भाचे होते. विशाल आनंद यांचे खरे नाव भिष्म कोहली. त्यांनी चलते चलते या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी स्वत: केले होते.
Another Sad News… #VishalAnand ji is no more RIP ?????? Sad News#ChalteChalte#DilSeMileDil … both have memorable music pic.twitter.com/IYYxl96JcF
— Girish Johar (@girishjohar) October 5, 2020
त्यासोबतच ‘इंतजार’, ‘सारेगामापा’, ‘दिल से मिले दिल’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’ आणि ‘किस्मत’ इत्यादी चित्रपटातून चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांनी जवळपास 11 हिंदी चित्रपटात काम केले होते.
विशाल आनंद यांना 1976 मधील चलते चलते चित्रपटासाठी ओळखले जाते. ”चलते-चलते मेरे यह गीत याद रखना” हे गाणं आताही तितकंच लोकप्रिय आहे. या गाण्यामुळे प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. चलते चलते या चित्रपटात अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी त्यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती.(Bollywood actor Vishal Anand passed away)
संबंधित बातम्या :
BellBottom Teaser | बहुप्रतीक्षित ‘बेलबॉटम’चा टीझर प्रदर्शित, अक्षय कुमार पुन्हा ‘खिलाडी’ अंदाजात!
Tamannaah Bhatia | ‘बाहुबली’ अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण, हैद्राबादच्या रुग्णालयात दाखल