Brahmastra | बॉक्स ऑफिसवर रणबीर- आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’चा जलवा कायम, सहाव्या दिवशी इतक्या कोटींची कमाई…
रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सहाव्या दिवशी तसे चित्रपटाचे कलेक्शन खूप चांगले झाले नसून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10.70 कोटींची कमाई केली आहे.
मुंबई : ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केलाय. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर 9 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सुरूवातीपासूनच चित्रपटासंदर्भात चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सर्वांचे लक्ष चित्रपटाच्या कलेक्शनवर होते. गेल्या काही दिवसांपासून बाॅडीवूडचे (Bollywood) चित्रपट बॉक्स ऑफिसवर फेल जात असताना ब्रह्मास्त्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरलाय. ओपनिंग डेला चित्रपटाने सुसाट अशी कामगिरी करून अनेकांना मोठा धक्का दिला. साऊथमध्ये जरी चित्रपटाला (Movie) पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नसला तरीही हिंदी व्हर्जनमध्ये चित्रपटाने चांगली कमाई केली.
सहाव्या दिवशी इतके कोटी झाले चित्रपटाचे कलेक्शन
रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सहाव्या दिवशी तसे चित्रपटाचे कलेक्शन खूप चांगले झाले नसून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10.70 कोटींची कमाई केली. अनेक चित्रपट समीक्षकांना ब्रह्मास्त्र चित्रपट आवडला नाही. मात्र, हा चित्रपट चाहत्यांच्या पचनी पडल्याचे चित्र असून ब्रह्मास्त्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली बॅटिंग करतोय. यामुळे अयान मुखर्जीसह आलिया भट्ट आणि रणबीर कपूर खुश आहेत.
हिंदी व्हर्जनमध्ये चित्रपटाची सर्वांधिक कमाई
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवडूच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणे सुरू असताना ब्रह्मास्त्र चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. हिंदी व्हर्जनमध्येच चित्रपटाला सर्वांधिक कमाई करण्यास यश मिळाले. ‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्या दिवशी 36.42 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 42.41 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 45.66 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 16.5 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 12.68 कोटी रुपये आणि सहाव्या दिवशी 10.70 कोटी रुपये कलेक्शन केले आहे.