Pratyusha Banerjee : मृत्यूच्या 5 वर्षांनंतर मोठी माहिती समोर, मुलाखत देत विकास गुप्तानं केला ‘हा’ खुलासा

विकास गुप्तानं ‘ई-टाइम्स’ ला एक मुलाखत दिली होती, ज्यात त्यानं अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीसोबत असलेल्या संबंधाचं सत्य सांगितलं होतं. (5 years after Pratyusha Banerjee's death, Vikas Gupta revealed about their Relationship in an interview)

Pratyusha Banerjee : मृत्यूच्या 5 वर्षांनंतर मोठी माहिती समोर, मुलाखत देत विकास गुप्तानं केला 'हा' खुलासा
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 10:43 AM

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीचं सुप्रसिद्ध नाव आणि नेहमीच वादाच्या भोव ऱ्यात असणाऱ्या विकास गुप्तानं (Vikas Gupta) आता एक मोठा खुलासा केला आहे. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना विकासनं अचानक एक मुलाखत देत एक धक्कादायक माहिती दिली आहे. ज्यात तो दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी (Pratyusha Banerjee) सोबतच्या संबंधाविषयी उघडपणे बोलला आहे.

प्रत्युषाशी संबंध

विकास गुप्तानं ‘ई-टाइम्स’ ला एक मुलाखत दिली होती, ज्यात त्यानं अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीसोबत असलेल्या संबंधाचं सत्य सांगितलं होतं. विकासनं सांगितलं की, त्याचे दोन मुलींशी संबंध होते, त्यापैकी एक प्रत्युषा बॅनर्जी होती. यानंतर जेव्हा अभिनेत्याला विचारलं गेलं की प्रत्युषाला आपल्या उभयलिंगाबद्दल (Bisexual) माहित आहे काय? यावर तो म्हणाला, ‘तिला आमच्या ब्रेकअपनंतर याविषयी माहिती मिळाली.’

प्रत्युषासोबत ब्रेकअप होण्याचं कारण

प्रत्युषा बॅनर्जीसोबत ब्रेकअप करण्याचं कारण सांगताना विकास गुप्ता म्हणाला, ‘ब्रेकअप झालं कारण काही लोक तिच्याबद्दल आणि माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलत होते. मात्र आता मला यावर फार सखोल चर्चा करायची नाही कारण आता ती या जगात नाही. पण ब्रेकअपनंतर मला प्रत्युषावर खूप राग आला होता. एकदा मी तिला रस्त्यावर पाहिलं, तेव्हा मी दुर्लक्ष केलं. प्रत्युषा मला आवडयची. मला तिच्यासोबत एक मोठ्या प्रकल्पावर काम करायचं होतं.’

2016 मध्ये प्रत्युषाचा मृत्यू , राहुल राज सिंह याच्यावर होता आरोप

प्रत्युषा बॅनर्जीचं 1 एप्रिल 2016 रोजी निधन झालं. तिनं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं. प्रत्युषा त्यावेळी राहुल राज सिंगला डेट करत होती. प्रत्युषाच्या निधनानंतर तिचा प्रियकर राहुल राज सिंह याला जबाबदार धरण्यात आलं. त्यानंतर प्रत्युषाच्या आई-वडिलांनी राहुल राज सिंगवर प्रत्युषाच्या मृत्यूचा आरोप केला होता.

विकास गुप्तानं राहुल राजसिंगबद्दल केलं ‘हे’ वक्तव्य

प्रत्यूषा बॅनर्जीच्या मृत्यूपूर्वी राहुलला भेटला आहेस का, असा प्रश्न विचारला असता, तेव्हा विकास म्हणाला, प्रत्युषाचा मृत्यू झाला तेव्हा मला आठवते की राहुल राज सिंह रुग्णालयाच्या बाहेर चिप्स खात होता. मी आत गेलो तेव्हा मकरंद मल्होत्रा ​​तिथं होता. प्रत्युषा राहुलच्या आधी मकरंदला डेट करत होती आणि ते तिच्या आयुष्यातील सर्वात गोड नातं होतं.

संबंधित बातम्या

Photo : पावसाळ्याचा आनंद लुटत जान्हवी कपूरनं शेअर केले बोल्ड फोटो, पाहा तिचा डान्सिंग अंदाज

Sonam Kapoor : फॅशन आयकॉन सोनम कपूरचा सोशल मीडियावर जलवा, फ्लोरल ड्रेसमध्ये सुंदर फोटो शेअर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.