KBC 14 : महानायक 79 वर्ष वयात सलग एवढे तास काम करतात, विश्वास बसणार नाही
प्रोमोमध्ये दिसते आहे की, अमिताभ बच्चन डायमंड कटिंग पॉलिशर असलेल्या स्पर्धकाला विचारतात की, खरा डायमंड तुम्ही कसे ओळखतात. त्यावर डायमंड कटिंग पॉलिशर उत्तर देतो आणि सांगतो की, मी तब्बल 12 तास काम करतो.
मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना बिग बी नावाने देखील ओळखले जाते. अमिताभ बच्चन 79 वयाचे असून अजूनही ते तब्बल 12 तास काम करतात. 20-30 वर्षांचे तरूण देखील 8 ते 9 तास काम करून थकतात. मात्र, बॉलिवूडमधील (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन सकाळी 6 ला शूटिंगला सुरूवात करून रात्री 8 पर्यंत शूटमध्ये व्यस्त राहतात. याचा खुलासा स्वत: अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या त्यांच्या प्रसिध्द शोमध्ये केलायं. अमिताभ बच्चन 79 वर्षांचे झाले असतील पण आजही ते कामाबद्दल तेवढेच समर्पित आहेत, जेवढे ते 40 वर्षांपूर्वी होते.
इथे पाहा अमिताभ बच्चन नेमके काय म्हणाले…
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी केला खुलासा
बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट अमिताभ बच्चन यांनी दिले आहेत. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही फार सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी अनेक प्रकारचे व्हिडीओ आणि फोटो ते कायमच पोस्ट करतात. अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’च्या 14 व्या सीझनला होस्ट करत आहेत. नुकतेच कौन बनेगा करोडपतीचा एक प्रोमो समोर आलायं. यामध्ये अमिताभ यांच्यासोबत हॉटसीटवर डायमंड कटिंग पॉलिशर असलेले स्पर्धक पुढे बसले आहेत.
79 वर्षांचे अमिताभ बच्चन करतात 12 तास काम
प्रोमोमध्ये दिसते आहे की, अमिताभ बच्चन डायमंड कटिंग पॉलिशर असलेल्या स्पर्धकाला विचारतात की, खरा डायमंड तुम्ही कसे ओळखतात. त्यावर डायमंड कटिंग पॉलिशर उत्तर देतो आणि सांगतो की, मी तब्बल 12 तास काम करतो. यावर बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, मग आपले सारखेच आहे. मी सकाळी 6 ला कामाला सुरूवात करतो आणि रात्री 8 पर्यंत शूटिंग सुरूच असते. मात्र, अमिताभ बच्चन यांचे हे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्काच बसलायं. 79 वर्षांचे असूनही अमिताभ बच्चन 12 तास काम करतात.