Laal Singh Chaddha: ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये भारतीय सैन्याचा अनादर केल्याप्रकरणी आमिर खानविरोधात तक्रार

भारतीय सैन्याचा (Indian Army) अनादर आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत आमिर, त्याचा चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Laal Singh Chaddha: 'लाल सिंग चड्ढा'मध्ये भारतीय सैन्याचा अनादर केल्याप्रकरणी आमिर खानविरोधात तक्रार
आमिर खानविरोधात तक्रारImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 11:31 AM

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा (Aamir Khan) लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट कायदेशीर अडचणीत सापडला आहे. भारतीय सैन्याचा (Indian Army) अनादर आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत आमिर, त्याचा चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. लाल सिंग चड्ढामधील भारतीय लष्कराच्या चित्रणामुळे सशस्त्र दलांचा अनादर झाल्याचा आरोप दिल्लीस्थित एका वकिलाने केला आहे. शुक्रवारी दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे त्यांनी तक्रार केली आहे. पॅरामाउंट पिक्चर्ससह चित्रपटाचे निर्माते, आमिर खान आणि दिग्दर्शक अद्वैत चंदन यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आमिरविरोधात तक्रार

एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, वकील विनीत जिंदाल यांनी दिल्ली पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत चित्रपटात आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप केला आहे. आयपीसी कलम 153 (दंगल घडवण्याच्या हेतूने चिथावणी देणे), 153A (वेगवेगळ्या गटांमधील वैर वाढवणे), 298 (कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणे) आणि 505 (सार्वजनिक दंगल घडवून आणणारी विधाने) अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी त्यांनी केली.

भारतीय सैन्याचा अनादर केल्याचा आरोप

“चित्रपटात निर्मात्यांनी असं चित्रण केलं आहे की कारगिल युद्धात लढण्यासाठी एका मतिमंद व्यक्तीला लष्करात सामील होण्याची परवानगी देण्यात आली होती. कारगिल युद्ध लढण्यासाठी लष्करातील सर्वोत्तम जवानांना पाठवण्यात आलं होतं आणि कठोर प्रशिक्षित लष्करी जवानांनी युद्ध लढलं होतं. पण चित्रपट निर्मात्यांनी भारतीय सैन्याचे मनोधैर्य खचवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी मुद्दाम या परिस्थितीचं चित्रण केलं”, असं त्यांनी तक्रारीत लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

संबंधित वकिलाने असाही आरोप केला आहे की चित्रपटातील एका दृश्याने धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या दृश्यामध्ये एक पाकिस्तानी कर्मचारी लाल सिंग चड्ढाला विचारतो की “मी नमाज अदा करतो, प्रार्थना करतो, लाल सिंग तू हे का करत नाही?” त्यावर लाल सिंगच्या भूमिकेतील आमिर म्हणतो, “माझी आई म्हणाली हा सर्व पूजापाठ मलेरिया आहे. त्यामुळे दंगल होतात.” चित्रपटातील हा संवाद संपूर्ण हिंदू समुदायाला उद्देशून बदनामीकारक असल्याचं वकिलांनी म्हटलंय.

लाल सिंग चड्ढामध्ये आमिरसोबत करीना कपूर, मोना सिंग आणि नाग चैतन्य यांच्याही भूमिका आहेत. टॉम हँक्सची मुख्य भूमिका असलेल्या ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा हा रिमेक आहे. काही वर्षांपूर्वी आमिरने भारताविषयी केलेल्या काही कमेंट्समुळे या चित्रपटावर सोशल मीडियावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत आमिरने यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला, “मला वाईट वाटतं काही लोकांचा असा विश्वास आहे की मला भारत आवडत नाही. परंतु ते असत्य आहे.”

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.