Aamir Khan | लाल सिंह चड्ढा फ्लाॅप झाल्यानंतर आमिर खान करतोय हे काम, अभिनेत्याने केला खुलासा
लाल सिंह चड्ढा फ्लाॅप गेल्याने आमिर खान खूप जास्त निराश झाल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई : आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेलाय. चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून आमिर कुठल्या पार्ट्यांमध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमाला अजिबात हजेरी लावत नाही. काही दिवसांपूर्वी आमिर खान स्पाॅट झाला होता. त्यावेळी थकलेला चेहरा, पांढरी दाढी आणि सुजलेले डोळे या लूकमध्ये आमिर दिसला होता. आमिर खानचे हे लूक पाहून चाहते देखील चिंतेमध्ये आले होते. लाल सिंह चड्ढा फ्लाॅप गेल्याने आमिर खान खूप जास्त निराश झाल्याचे सांगितले जात आहे.
मुळात लाल सिंह चड्ढा या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. याचाच फटका हा आमिर खानच्या चित्रपटाला बसल्याचे सांगितले जातंय.
लाल सिंह चड्ढाच्या माध्यमातून आमिर खान याने तब्बल 4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले होते. या चित्रपटाकडून आमिरला खूप जास्त अपेक्षा होत्या. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.
2022 मधील सर्वात मोठा फ्लाॅप गेलेला आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा हाच चित्रपट आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आमिर खान याने सांगितले की, आता तो नेमका काय करत आहे.
आमिर खान म्हणाला की, मी पुढचे एक वर्ष माझ्या कुटुंबियांना वेळ देणार आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून सतत काम करत असल्याने कुटुंबाला वेळ कधी दिलाच नाहीये.
अजून एक वर्ष माझा वेळ हा कुटुंबासाठी असेल आणि त्यानंतर मी अभिनयाकडे वळेल असे आमिर खान याने सांगितले आहे. नुकताच आमिर खानची लेक इरा हिचा साखरपुडा झाला असून तिने नुपूर शिखरेसोबत नवी सुरूवात केलीये. सलाम वेंकी या काजोलच्या चित्रपटामध्ये आमिर खान याचा छोटासा रोल आहे.