Aamir Khan: IPL फिनालेमध्ये आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर होणार प्रदर्शित; उत्सुकता शिगेला

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटानंतर आमिर खान मोठ्या पडद्यापासून दुरावला होता. आता चार वर्षांनंतर तो लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

Aamir Khan: IPL फिनालेमध्ये आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'चा ट्रेलर होणार प्रदर्शित; उत्सुकता शिगेला
laal singh chaddha Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 3:17 PM

अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपटांपैकी एक आहे. त्यामुळेच आमिर खान प्रॉडक्शन्सकडून या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम खास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. आमिरने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं की त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचा ट्रेलर आयपीएल 2022 च्या फिनालेदरम्यान (IPL Finale 2022) लाँच केला जाईल. आता निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याची वेळदेखील जाहीर केली आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे.

Koo App

हे सुद्धा वाचा

इंस्टाग्रामवर ‘लाल सिंग चड्ढा’चं पोस्टर शेअर करताना आमिर खान प्रॉडक्शन्सने लिहिलं की, ‘लाल सिंग चड्ढाचा ट्रेलर आयपीएल 2022 फिनालेच्या पहिल्या डावाच्या दुसऱ्या टाइमआऊटदरम्यान लाँच केला जाईल. IPL 2022 चा फिनाले आज (29 मे) रात्री 8 वाजता सुरु होईल. आमिर खानच्या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्या डावानंतर म्हणजेच साधारण 11 षटकांनंतर दुसऱ्या टाइमआऊट दरम्यान रात्री 9:00 ते 9:30 वाजता प्रदर्शित होईल.

ट्विट-

लाल सिंग चड्ढा हा ऑस्कर विजेता अमेरिकन नाटक फॉरेस्ट गम्पचा (1994) रिमेक आहे. या चित्रपटात भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या घटना जसे की आणीबाणी, 1983 क्रिकेट विश्वचषक, ऑपरेशन ब्लू स्टार, रथयात्रा आणि 1999 कारगिल युद्ध यांचाही उल्लेख असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाल सिंग चड्ढाचे संपूर्ण भारतात शंभराहून अधिक ठिकाणी शूटिंग झाले आहे. या चित्रपटात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचीही माहिती आहे.

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटानंतर आमिर खान मोठ्या पडद्यापासून दुरावला होता. आता चार वर्षांनंतर तो लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात आमिर, करीनाशिवाय दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यचीही भूमिका आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.