जेव्हा Aamir Khan कलश पूजन करतो आणि Kiran Rao शेजारी हात जोडून… निमित्त काय?
आमीर खान आणि किरण राव एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर पुजेनिमित्त जेव्हा एकत्र दिसतात! चर्चा तर होणारच...
मुंबई : आमीर खान आणि किरण राव एकत्र दिसले आहेत. आमीर खान याने कलश पुजन केलं. या पुजेचं आयोजन करण्यात आलं होतं आमीर खान प्रॉक्शनच्या कार्यालयात. यावेळी किरण रावही आमीरसोबत दिसून आली. दोघांनी पुजेनंतर एकत्र आरतीदेखील केली. लाल सिंग चड्डा सिनेमाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी हे फोटो शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेले हे फोटो पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. आमीर खान आणि किरण राव हे एकमेकांपासून वेगळे झाले असले, तरी कामाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा सोबत आल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
हिंदू पद्धतीप्रमाणे आमीर खान यानं विधीवत पुजा केली. यावेळी त्याने डोक्यावर नेहरु टोपी देखील घातल्याचं पाहायला मिळालं. पुजेवेळी आमीर खान याच्या असलेल्या लुकचीही आता चर्चा रगंली आहे. पुजेनिमित्त आमीर खान प्रोडक्शनचं ऑफिसही खास सजवलं गेलं होतं.
याच पुजेदरम्यान, किरण राव आणि आमीर खान आरतीवेळी एकमेकांच्या शेजारी उभे असल्याचं पाहायला मिळालं. अत्यंत साध्या वेशात दिसून आलेला किरण आणि आमीर यांचा लूक अनेकांना भावला आहे.
View this post on Instagram
किरण राव आणि आमीर खान या दोघांनीही आरतीचं ताट पुजेसमोर ओवाळतानाचा फोटोही दिग्दर्शक अद्वैत यांनी शेअर केला आहे. अनेक सेलिब्रेटींनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
जुलै 2021 साली आमीर खान आणि किरण राव या दोघांनी एकमेकांपासून आपण वेगळे होत असल्याचं जगजाहीर केलं होतं. आपण एकमेकांचे पतीपत्नी जरी नसलो, तरी एकमेकांच्या कुटुंबाचा भाग नक्कीच असू, असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. किरण राव आणि आमीर खान यांनी 15 वर्ष एकत्र संसार केला होता. त्यांच्या वेगळ्या होण्याची चाहत्यांमध्ये तुफान चर्चाही झाली होती. आता पुन्हा एका पुजेच्या निमित्ताने दोघेही एकत्र दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. तर काहींना हे क्षण सुखावून गेलेत.