Radhika Merchant: अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटच्या ‘अरंगेत्रम’ समारंभात बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी
शास्त्रीय नृत्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला सर्वांसमोर ते नृत्य सादर करावं लागतं. यालाच 'अरंगेत्रम' समारंभ म्हणतात. राधिका मर्चंट ही उत्कृष्ट नृत्यांगना असून त्याचीच झलक या कार्यक्रमात पहायला मिळाली. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कोरोना आणि लॉकडाउनमुळे गेल्या काही महिन्यांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मात्र आता निर्बंध उठवल्यानंतर पुन्हा एकदा अशा कार्यक्रमांचं आयोजन होऊ लागलं. नुकतंच नीता अंबानी आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी त्यांच्या होणाऱ्या धाकटी सुनेसाठी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला सलमान खान, आमिर खानपासून बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट (Radhika Merchant) हिच्या ‘अरंगेत्रम’ समारंभासाठी (Arangetram ceremony) जय्यत तयारी करण्यात आली होती. शास्त्रीय नृत्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला सर्वांसमोर ते नृत्य सादर करावं लागतं. यालाच ‘अरंगेत्रम’ समारंभ म्हणतात. राधिका मर्चंट ही उत्कृष्ट नृत्यांगना असून त्याचीच झलक या कार्यक्रमात पहायला मिळाली. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राधिका ही नीता आणि मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीची होणारी पत्नी आहे. मुंबईतल्या बीकेसी इथल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राधिकाला प्रोत्साहन देण्यासाठी अंबानी कुटुंबीयांसोबतच बॉलिवूडमधील नामवंत सेलिब्रिटी हे पारंपरिक पोशाखात उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांची आधी कोविड चाचणी करण्यात आली.
पहा राधिका मर्चंटच्या परफॉर्मन्स व्हिडीओ-
View this post on Instagram
View this post on Instagram
राधिकाने तिच्या दमदार नृत्यकौशल्याने उपस्थितांची मनं जिंकली. गुरू सुश्री भावना ठाकर यांच्याकडून ती नृत्याचे धडे घेत होती. त्यांनी राधिकाला गेल्या 8 वर्षांपासून नृत्याचं प्रशिक्षण दिलं. अनेक वर्षांच्या या प्रशिक्षणानंतर जेव्हा शिष्य सर्वांसमोर आपलं नृत्यकौशल्य सादर करतो, तेव्हा त्याला ‘अरंगेत्रम’ म्हटलं जातं. विशेष म्हणजे राधिकाची होणारी सासू नीता अंबानी यांनीसुद्धा भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं आहे.