Prakash Jha: “इथे मुलीने जीन्स घातली तरी..”; प्रकाश झा यांचं सडेतोड उत्तर

प्रकाश झा यांचा 'मट्टो की सायकील' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त ते मुलाखती देत आहेत. या मुलाखतींमध्ये त्यांनी बॉयकॉट ट्रेंडवरही आपलं मत मांडलं.

Prakash Jha: इथे मुलीने जीन्स घातली तरी..; प्रकाश झा यांचं सडेतोड उत्तर
Prakash JhaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 6:14 PM

दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) हे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडच्या ‘कॅन्सल कल्चर’वर (Cancel Culture) व्यक्त झाले. आश्रम (Aashram) या वेब सीरिजमधून हिंदुंच्या भावना दुखावल्याच्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. प्रकाश झा यांची आश्रम ही सीरिज एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली होती. या सीरिजवर हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप झाला. इतकंच नव्हे तर भोपाळमध्ये या सीरिजच्या सेटचीही तोडफोड करण्यात आली होती. ट्विटरवर या सीरिजविरोधात बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला होता. यावर बोलताना प्रत्येकाला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, असं प्रकाश झा म्हणाले.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून लोक माझ्यावर नाराज आहेत. आता मला हेच बोलावं लागेल की संविधानात व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यासोबतच नाराज होण्याचंही स्वातंत्र्य असावं. भारतात हे मूलभूत हक्कांच्या यादीत समाविष्य केलं जावं. कारण आपण प्रत्येक गोष्टीने नाराज होतोच. जर एखादी मुलगी जीन्स परिधान करत असेल, तरी आपल्याला आक्षेप असतो. एखाद्याने टिळा लावला किंवा श्लोक म्हटलं तरी त्यावर आक्षेप नोंदवला जातो. नाराज होण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे घाबरू नका.”

प्रकाश झा यांचा ‘मट्टो की सायकील’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त ते मुलाखती देत आहेत. या मुलाखतींमध्ये त्यांनी बॉयकॉट ट्रेंडवरही आपलं मत मांडलं. “ते बकवास चित्रपट बनवतायत हे त्यांना समजलं पाहिजे. फक्त पैसा, कॉर्पोरेट्स आणि कलाकारांना तगडं मानधन देऊन चित्रपट बनत नाहीत. त्यासाठी तुम्हाला चांगली कथा लिहावी लागेल”, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.